वृत्त विशेषशिक्षण मंत्रालयसरकारी योजना

प्रधानमंत्री दक्षता आणि कुशलता संपन्न हितग्रही (पीएम-दक्ष) योजना – PM Daksh Yojana 2023-2024

प्रधानमंत्री दक्षता आणि  कुशलता संपन्न हितग्रही (PM-DAKSH) योजना ही एक केंद्रीय क्षेत्र योजना असून ती,  2020-21 मध्‍ये सुरू करण्यात आली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट लक्ष्य गटांचा  सक्षमता स्तर वाढवून त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी त्यांना स्वयंरोजगार आणि वेतन -रोजगार या दोन्ही ठिकाणी रोजगारक्षम बनवणे हा आहे. या योजनेंतर्गत लक्ष्य गट अनुसूचित जाती, ओबीसी, ईबीसी, डीएनटी सफाई कर्मचारी, ज्यामध्‍ये कचरा वेचणारे इत्यादी लोक आहेत. या योजनेमध्ये 18-45 वर्षे वयोगटातील लोकांना  समाविष्‍ट करून घेतले जाते. अनुसूचित जाती, सफाई कर्मचारी, कचरा वेचक आणि डीएनटी यांच्यासाठी उत्पन्नाची निकष मर्यादा नाही. ओबीसींसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख रूपयांपेक्षा कमी आणि ईबीसींसाठी (आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय) वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख रूपयांपेक्षा कमी असावे.

प्रशिक्षणाचे प्रकार, कालावधी आणि प्रति उमेदवार सरासरी खर्च

  1. अप-स्किलिंग/रीस्किलिंग (35 ते 60 तास/5 दिवस ते 35 दिवस):-रु.3000/- ते रु.8000/-
  2. अल्पकालीन प्रशिक्षण (300 तास/3  महिने):-रु.22,000/-
  3. उद्योजकता विकास कार्यक्रम (90 तास/15 दिवस): रु.7000/-
  4. दीर्घकालीन प्रशिक्षण (650  तास/7  महिने):- रु. 45,000/-

प्रशिक्षणाचे शुल्क कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य नियमांनुसार आहे आणि ते अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार बदलते. कचरा वेचकांसह सफाई कर्मचार्‍यांसाठी अप-स्किलिंग  35 तास/5 दिवसांसाठी आहे ज्यात प्रति उमेदवार सरासरी रु.3000/- खर्च येतो.

प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण  मोफत दिले जाते.  या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन  दिले जाते. यामध्‍ये अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांना रु. 1,500/- प्रति महिना आणि अनिवासी अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी रू. 1,000/- प्रति महिना ओबीसी /ईबीसी/डीएनटींना  आणि वेतन भरपाई रु.2500 /- प्रति उमेदवार अनुसूचित जाती/ओबीसी/ईबीसी/डीएनटी उमेदवारांना अपस्किलिंग/रिस्किलिंग प्रोग्रामसाठी दिले जाते. अपस्किलिंग कार्यक्रमासाठी सफाई कर्मचारी उमेदवारांना प्रति उमेदवार रुपये 500/- वेतन भरपाई दिली जाते.

पीएम-दक्ष योजनेअंतर्गत 2020-21 ते 2022-23 मधील कामगिरी खाली दिली आहे:

(आकडे कोटी  रुपयेमध्‍ये)

Year Target Commenced Placement

(up to 31.07.2023)

Financial Target Funds released
2020-21 37,958 32,097 24,652 50.00 44.79
2021-22 49,800 42,002 31,033 80.19 68.22
2022-23 51,900 33,021 21,552* 83.64 14.94
TOTAL 1,39,658 1,07,120 77,237 213.83 127.95

*मूल्यांकन आणि प्रमाणपत्रानंतर केले जाते, ज्यांनी  कामामध्‍ये प्रगती दाखवली  आहे, त्यांना नोकरी मिळू शकते.

पीएम-दक्ष योजनेअंतर्गत 2023-24 ते 2025-26 या कालावधीत 1,69,300 उमेदवारांना पुढील तीन वर्षांमध्ये प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी  रु. 286.42 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद असून  या योजने अंतर्गत ध्‍येय पूर्ण करण्‍यासाठी  अंदाजे खर्चासह वर्षनिहाय उद्दिष्ट खाली देण्‍यात आले आहे.

Year No. of Candidates to be trained Estimated Expenditure (In Rs. Crore)
2023-24 53,900 92.47
2024-25 56,450 94.91
2025-26 58,950 99.04
Total 1,69,300 286.42

या योजनेमध्‍ये 2020-21 ते 2022-23 पर्यंतच्या अंमलबजावणीच्या मागील तीन वर्षांमध्ये एकूण 1,07, 156 जणांना  प्रशिक्षित करण्यात आले असून त्यासाठी   पीएम-दक्ष योजनेअंतर्गत   अंतर्गत 213.83 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

हेही वाचा – पीएम दक्ष योजना – PM-Daksh Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.