कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) मध्ये शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचे ३ हप्ते मिळतात. या PM-Kisan योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास नोंदणी (PM-Kisan New Farmer Registration) करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवले जातं किंवा PM-Kisanच्या वेबसाईटवरही तुम्ही ते (PM Kisan Beneficiary Status) चेक करू शकता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी खात्याचे/हप्त्याचे ऑनलाईन स्टेटस चेक करा – PM Kisan Beneficiary Status:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन करण्यासाठी PM Kisan Beneficiary Status च्या खालील लिंकवर क्लिक करून ओपन करा.

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx

त्यानंतर तिथं तुम्हाला मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर Get OTP  या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स (PM Kisan Beneficiary Status) विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

Know Your PM Kisan Beneficiary Status
Know Your PM Kisan Beneficiary Status

या माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.

सरकारने जारी केलेले आता पर्यंत PM-Kisanचे सर्व हप्ते तुम्हाला पाहायला मिळतील. सरकारकडून या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकर्‍याला 2 हजार रुपयांच्या तीन हफ्त्यात 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे जरूरी आहे.

जो नवीन हप्ता येणार आहे त्यामध्ये काहींच्या PM Kisan Beneficiary Status मध्ये FTO Generated असे दिसत आहे म्हणजेच Fund Transfer Order, तुम्हाला ‘एफटीओ (फंड ट्रान्सफर ऑर्डर’) व्युत्पन्न झाल्याची आणि पेमेंट कन्फर्मेशन प्रलंबित असल्याचे आढळल्यास, याचा अर्थ असा आहे की सरकारने लाभार्थीने दिलेल्या सर्व माहितीची पुष्टी केली आहे आणि हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, आणि लवकरच ती जमा केली जाईल.

तसेच काहींच्या PM Kisan Beneficiary Status मध्ये RFT Signed असे दिसत आहे म्हणजेच Request for Transfer म्हणजे लाभार्थीचा डेटा तपासला गेला व पुढील प्रक्रियेसाठी विनंती हस्तांतरित केली गेली.

PM Kisan Beneficiary Status
PM Kisan Beneficiary Status

Beneficiary Status मध्ये जर Payment Hold किंवा इतर Status रिमार्क असेल तर, PM KISAN Help Desk: 011 23381092 हेल्पलाइन नंबरवर संपर्क करा किंवा इथे क्लिक करून ऑनलाईन तक्रार करा.

या लेखात, आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स (PM Kisan Beneficiary Status) ऑनलाईन चेक कसे करायचे? या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख देखील वाचा !

  1. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स चेक करा – Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana (NSMNY) Beneficiary Status
  2. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  3. प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
  4. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  5. PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
  6. पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
  7. बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
  8. ॲग्रिस्टॅक योजनेचे फायदे काय? ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  9. PM किसान व नमो शेतकरी (Namo Shetkari Yojana) योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !

  • Sunil Wagh

    ज्यांना मागिल हफ्ता मिळाला नाही . त्यांचे काय होणार.
    दोन हफ्ते सोबत मिळणार की दोन्ही पण मिळणार नाहीत.

    Reply
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना : तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार (Grievance PM Kisan)👇
      https://bit.ly/3yB5RRm

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.