कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; लाभार्थी हिस्सा भरणेबाबत सुधारित सुचना जारी

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी हिस्सा भरणेबाबत सुधारित सुचने बाबत परिपत्रक जारी केले आहे, यामध्ये पंपाचा कोठा, पेमेंटची शेवटची तारीख इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; लाभार्थी हिस्सा भरणेबाबत सुधारित सुचना:

अ) कुसुम टप्पा २ ची अंमलबजावणी दि. ६ मे २०२२ पासून सुरु झाली असून लाभार्थ्यांनी नोंदणी व लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. लाभार्थी हिस्सा भरताना Online पद्धतीने UPI – BHIM / QR CODE चा वापर करून एकूण १३,३०० नोंदणी पैकी ८००० लाभार्थ्यांनी भरणा केला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी या सुविधाजनक पद्धतीचा अधिकाधिक व प्राधान्याने वापर करावा.

ब) i) ज्यांना वरीलप्रमाणे ऑनलाईन पेमेंट करणे शक्य नाही, त्या लाभार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने NEFT द्वारे देखील पेमेंट करता येईल. ज्यांनी चलन अथवा धनाकर्ष (डी.डी) हा/ पर्याय निवडून चलनाची/डी.डी Slip ची प्रिंट घेतली आहे. त्यांनी स्वतःचे बँक खाते असलेल्या शाखेमध्ये जाऊन त्यावरील NEFT DETAILS (बँक खाते क्र, IFSC CODE व खाते धारक- Maharashtra Energy Development Agency) च्या आधारे स्वतःच्या खात्यातून NEFT द्वारे महाऊर्जा खात्यावर रक्कम जमा करावी.

ii) लाभार्थ्याने Offline NEFT केल्यानंतर बँकेचा सही शिक्का व शक्यतो UTR नंबर नमूद असलेल्या पावतीचा फोटो कुसुम पोर्टलवर अपलोड करावा.

iii) Offline NEFT करतांना आपल्या बँकेमध्ये अडचण आल्यास कोटक महिंद्रा बँकेच्या संपर्क अधिका-यांशी संपर्क करावा. (तपशील सोबत जोडले आहेत)

क) वरील दोन्ही पर्याय वापरल्यास धनाकर्ष (डी.डी) अथवा चलना आधारे रोख रक्कम भरण्यातील अडचणी दूर होतील व विनाविलंब पुरवठादाराची निवड (Assign Vendor) या टप्प्यावर जाता येईल.

(ड) ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी धनाकर्ष (डी.डी.) अथवा चलनाद्वारे रोख रक्कम जमा करण्याचा पर्याय निवडला आहे, मात्र त्यांना वरीलप्रमाणे Online Payment/Offline NEFT द्वारे भरणा करण्याचा पर्याय घ्यायचा असल्यास त्यांनी पुन्हा पोर्टलवर जाऊन Online Payment / Offlinc – NEFT चा सुधारित पर्याय निवडून विनाविलंब व सहजरीत्या लाभार्थी हिस्सा जमा करता येईल. ही सुविधा दिनांक ११ मे २०२२ पासून कार्यान्वीत करण्यात येत आहे.

इ) ज्यांनी धनाकर्ष महाऊर्जाच्या स्थानिक कार्यालयात जमा केले आहेत, अथवा चलनाच्या आधारे लाभार्थी हिस्सा महाऊर्जा खात्यावर यशस्वीपणे भरणा केला आहे, त्यांनी पोर्टलवर पुढील कार्यवाही करावी. अडचणी उदभवल्यास पोर्टलवरील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा.

(ई) लाभार्थी हिस्सा भरण्याची सुधारित मुदत दि. ३१/५/२०२२ अखेरपर्यंत वाढविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना परिपत्रक: लाभार्थी हिस्सा भरणेबाबत सुधारित सुचना बाबत परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – कुसुम सोलर पंपाची सुधारित किंमत व लाभार्थी हिस्सा २०२२ – Revised Price and beneficiary share of Kusum Solar Pump

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.