महानगरपालिकावृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

मालमत्ता कराच्या सर्व घटकातून सूट – बृहन्मुंबई महानगरपालिका

सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 25 दि. 21 मार्च, 2022 नुसार, मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.

(1) सन 1888 च्या अधिनियम क्र.3 याच्या कलम 140 मधील ” (1 अ) अधिनियमाच्या या कलमामध्ये किंवा इतर कोणत्याही तरतुदीमध्ये अंतर्भूत असले तरी, 1 जानेवारी, 2022 पासून महानगरपालिका 46.45 चौ.मी. ( 500 चौ.फूट ) किंवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी गाळ्यांवर कलम 139 अ च्या पोटकलम ( 1 ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मालमत्ता कराचा कोणताही कर घटक बसवणार नाही.”

(2) प्रकरण तीन मधील नमुद महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी ( उपकर ) अधिनियम, 1962 च्या अधिनियम क्र. 27 मध्ये कलम 7 अ समाविष्ट केला आहे. त्यानुसार ” 7 अ. अधिनियमाच्या कलम 4 मध्ये किंवा इतर कोणत्याही तरतुदींमध्ये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, बृहन्मुंबई महानगरपालिका, 1 जानेवारी 2022 पासून, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील, 46.45 चौ. मीटर ( 500 चौ. फूट ) किंवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारतींवर किंवा निवासी गाळ्यांवर कलम 4 मध्ये विनिर्दिष्ट केलेला शिक्षण उपकर बसवणार नाही व वसूल करणार नाही.”

(3) प्रकरण चार मधील नमुद महाराष्ट्र ( नागरी क्षेत्रे ) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 च्या अधिनियम क्र. 44 मध्ये कलम 18 मध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आली. त्यानुसार ” ( 1 ब -1 ) पोट – कलम ( 1 ) व ( 1 अ ) यांमध्ये किंवा अधिनियमाच्या इतर कोणत्याही तरतुदींमध्ये किंवा इतर कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, बृहन्मुंबई महानगरपालिका, 1 जानेवारी 2022 पासून, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील, 46.45 चौ. मीटर ( 500 चौ. फूट ) किंवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारतींवर किंवा निवासी गाळ्यांवर पोट – कलम ( 1 ) मध्ये विनिर्दिष्ट केलाला वृक्ष उपकर बसवणार नाही व वसूल करणार नाही. ”

उपरोक्त सुधारणेस अनुसरुन दि.01.01.2022 च्या प्रभाव्य दिनांकापासून विषयांकीत मालमत्तेच्या कराचे दायित्व शुन्यांकीत करण्यात आले आहे. येथे असेही सुचित करण्यात येते की, सन 2021-22 या कालखंडाच्या द्वितिय सहामाही कालावधीचे अधिदान, सुधारित देयके तयार होण्यापूर्वीच्या कालावधीत झालेले आहे.

त्यामुळे अशा प्रकारे झालेले अधिदान, सुधारित देयक रकमेहून अधिक असल्याचे दिसून आल्यास, अशा अतिरिक्त रकमेचे प्रतिदान / समायोजन करण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसार व गुणवत्तेनुसार विभागीय स्तरावर कार्यवाही करण्यात यावी. प्रस्तुतचे परिपत्रक निर्गमित केल्यामुळे, यापुर्वी प्रसारित केलेले दि. 29.01.2021 चे परिपत्रक क्र.कवसं / 1929 / एमसी / 625 / सांख्यिकी / 2020-21, दि.01.01.2022 च्या प्रभाव्य दिनांकापासून रद्दबातल समजण्यात यावे.

हेही वाचा – मालमत्ता (जमीन/घर/दुकान) यांचे नोंदणी कागदपत्रे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “मालमत्ता कराच्या सर्व घटकातून सूट – बृहन्मुंबई महानगरपालिका

  • Kiran Shukla

    Sir,please give a circular copy of
    Reduce property tax and can implement in mumbai?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.