आपले सरकार - महा-ऑनलाईनउद्योग उर्जा व कामगार विभागबांधकाम कामगार कल्याणकारी योजनामहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

बांधकाम कामगारांना सुरक्षा संच योजना 2025 – मोफत सेफ्टी किट लाभासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर !

सुरक्षा संच म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाकडून मोफत पुरवला जाणारा सेफ्टी किट (Saruksha Sanch – Safety Kit). या संचामध्ये हेल्मेट, हातमोजे, बूट, मास्क, जॅकेट यांसारख्या वस्तूंचा समावेश असतो. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून (MAHABOCWWB) ही योजना राबवली जाते.

सुरक्षा संच योजना – Saruksha Sanch Yojana:

सुरक्षा संच (Saruksha Sanch – Safety Kit) योजनेचा उद्देश म्हणजे — बांधकाम कामगारांचे प्राण व आरोग्य सुरक्षित ठेवणे, तसेच त्यांच्या कामाच्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण कमी करणे. १८ जून २०२५ रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने “सुरक्षा संच (Saruksha Sanch – Safety Kit)” योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही योजना फक्त महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत (दर्जेदार) कामगारांसाठी लागू आहे.

👷‍♂️ पात्रता (Eligibility)

सुरक्षा संच (Saruksha Sanch – Safety Kit) योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील अटी आवश्यक आहेत:

  1. नोंदणी: कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक.

  2. सदस्यत्व वैध असणे: नोंदणी क्रमांक वैध असावा आणि सदस्य सक्रिय असावा.

  3. प्रमाणपत्रे: आधार कार्ड, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर व वैयक्तिक तपशील ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक.

🧾 सुरक्षा संचामध्ये मिळणाऱ्या वस्तूंची यादी:

शासन निर्णयानुसार सुरक्षा (Saruksha Sanch – Safety Kit) संचामध्ये खालील १३ वस्तू असतील.

  1. सेफ्टी हार्नेस बेल्ट (Safety Harness Belt)

  2. सेफ्टी शूज (Safety Shoes)

  3. कानासाठी Ear Plug

  4. मास्क

  5. रिफ्लेक्टिव्ह जॅकेट (Reflective Jacket)

  6. हेल्मेट

  7. हातमोजे (Safety Gloves)

  8. सेफ्टी गॉगल्स (Safety Goggles)

  9. मच्छरदाणी (Mosquito Net)

  10. पाण्याची बाटली (Water Bottle)

  11. स्टीलचा टिफिन बॉक्स

  12. सोलर टॉर्च

  13. प्रवासी बॅग (Travel Kit Bag)

अर्ज करण्याची प्रोसेस – MBOCWWB Safety Kit:

बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप (safety kit) योजनेसाठी अर्ज ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने करता येते:

1: नोंदणी क्रमांक मिळवा:

बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप (safety kit) योजनेसाठी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://iwbms.mahabocw.in/profile-login

पोर्टल ओपन केल्यनानंतर आपला आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.

आता तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाकून ‘Validate OTP’ करा. पुढे तुमचा BOCW नोंदणी क्रमांक मिळेल, तो कॉपी करून किंवा लिहून ठेवा.

2: कामगार – नवीन अपॉइंटमेंट तपशील:

नोंदणी क्रमांक भेटल्यानंतर आता सुरक्षा संच वाटप (safety kit) योजनेची नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी खालील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://kitdist-v2.mahabocw.in/safety-kit/appointment

पोर्टल ओपन केल्यनानंतर नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली “BOCW कामगार नोंदणी क्रमांक” मध्ये टाका आणि Send OTP वर क्लिक करा.

आता मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफाय करा, त्यानंतर आपली सर्व वैक्तिक माहिती दाखवली जाईल.

पुढे Select Camp / शिबिर निवडा – आपल्याजवळील केंद्र निवडा आणि Appointment Date निवडा – उपलब्ध तारीख निवडा.(सूटीच्या दिवशी किंवा फुल्ल झालेल्या स्लॉटवर नियुक्ती मिळणार नाही.)

3: अपॉइंटमेंट प्रिंट घ्या

  1. पुढे ‘PRINT APPOINTMENT’ वर क्लिक करा.
  2. दिलेल्या तारखेचाअपॉइंटमेंट स्लिप प्रिंट करून ठेवा.
  3. निवडलेल्या दिवशी संबंधित शिबिरात उपस्थित राहा आणि सुरक्षा संच (safety kit) प्राप्त करा.

उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety kit) पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा अर्ज करताना अडचण येत असेल, तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील कामगार कल्याण अधिकारी किंवा शिबिर कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1. सुरक्षा संच योजना कोणासाठी आहे?
➡ ही योजना महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे.

Q2. सुरक्षा संच कुठे मिळतो?
➡ अपॉइंटमेंट घेऊन जवळच्या वितरण केंद्रावरून Safety Kit मिळते.

Q3. यात कोणत्या वस्तू मिळतात?
➡ हेल्मेट, हातमोजे, शूज, मास्क, जॅकेट, टिफिन बॉक्स, सोलर टॉर्च इत्यादी 13 वस्तू.

Q4. अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
➡ आधार कार्ड, मोबाईल नंबर, नोंदणी क्रमांक व ओळखपत्र.

Q5. ही योजना कायम आहे का?
➡ शासनाच्या निर्णयानुसार 2025 पासून ही योजना पुनः सुरु करण्यात आली आहे.

या लेखात, आम्ही बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा संच (Saruksha Sanch – Safety Kit) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख देखील वाचा !

  1. बांधकाम कामगारांना मोफत अत्यावश्यक संच लाभासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर !
  2. बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप सुधारित योजना
  3. बांधकाम कामगारांना मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा !
  4. बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी – नोंदणी व नूतनीकरण आता पूर्णपणे मोफत!
  5. बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर!
  6. बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट!
  7. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर.
  8. ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देऊन नोंदणी करणेबाबत शासन नियम
  9. UMANG पोर्टल वरून असे बनवा ई-श्रम यूएएन कार्ड !
  10. ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
  11. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
  12. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना
  13. अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण!
  14. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
  15. बांधकाम कामगारांनी अमिषाला बळी पडू नये; कामगार मंडळाचे आवाहन !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.