सरकारी योजना

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांकरिता बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व थेट कर्ज योजना (महामंडळ) सुरू असून मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. १८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

गरजू व्यक्तीनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर भेट द्या, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. मुंबई शहर व उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना व लाभार्थीची अर्हता

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

  • शरद जालिंदर कुडे

    मी खूप दिवसा पासून कर्ज घेऊ इच्छुतो नवा व्यवसाय करायचा आहे 5 लाख रुपये जरुरी आहे तर मला लोन मिळेल काय

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.