रब्बी हंगाम 2022-23 साठी 1 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नत्र (N), फॉस्फरस(P), पोटॅश (K) आणि गंधक (S) या विविध पोषक घटक युक्त फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदानाच्या (NBS) प्रति किलोग्रॅम दराच्या खत विभागाच्या प्रस्तावाला रब्बी हंगाम – 2022-23 (01.10.2022 ते 31.03.2023 पर्यंत) करिता खाली दिल्यानुसार मंजुरी दिली आहे :
वर्ष | रुपये प्रति किलोग्रॅम | |||
N | P | K | S | |
रब्बी, 2022-23 (01.10.2022 ते 31.03.2023 पर्यंत) |
98.02 | 66.93 | 23.65 | 6.12 |
आर्थिक खर्च:
रब्बी हंगाम -2022 साठी (01.10.2022 ते 31.03.2023 पर्यंत) केंद्रीय मंत्रिमंडळाने पोषक तत्वांवर आधारित अनुदान म्हणून मालवाहतूक अनुदानाद्वारे स्वदेशी खताला (SSP) पाठबळासह 51,875 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
फायदे:
यामुळे रब्बी 2022-23 मध्ये शेतकऱ्यांना खतांच्या अनुदानित / परवडणाऱ्या किमतीत सर्व फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांची सहज उपलब्धता शक्य होईल आणि कृषी क्षेत्राला आधार मिळेल. खते आणि कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील अस्थिरता प्रामुख्याने केंद्र सरकारने विचारात घेतली आहे.
पार्श्वभूमी:
सरकार खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी युरिया 25 ग्रेडची खते उपलब्ध करून देत आहे. फॉस्फेट आणि पोटॅश खतांवरील अनुदान हे 01-04-2010 पासून पोषक तत्वांवर आधारित अनुदान योजनेद्वारे नियंत्रित केले जाते. आपल्या शेतकरी हिताच्या दृष्टीकोनानुसार, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.
खते आणि युरिया, डीएपी, एमओपी आणि गंधक या कच्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे, सरकारने डीएपीसह फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांवर अनुदान वाढवून वाढीव किमतीचा बोजा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खत कंपन्यांना मंजूर दरांनुसार अनुदान दिले जाईल जेणेकरून ते शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देऊ शकतील.
हेही वाचा – गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!