नोकरी भरतीमहसूल व वन विभागवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – 2023 – Talathi Recruitment Exam Time Table Announced

भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट- क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून, पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदांसाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्य आहे, असेही रायते यांनी सांगितले.

परीक्षा टप्पे:

पहिला टप्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट

दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – 2023 – Talathi Recruitment Exam Time Table Announced:

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र. ४५/२०२३ दि.२६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर तलाठी भरती परीक्षेकरिता TCS कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या आहेत. सदर परिक्षा दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि.१४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असेल सदर परिक्षा सत्रात आयोजित करणेत आलेली आहे. सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र परिक्षा दिनांकपरिक्षा वेळ 
1१७ ऑगस्ट २०२३सत्र १ ले – सकाळी ९.०० से ११.००

सत्र २ रे – दुपारी १२.३० ते २.३०

सत्र ३ रे – सायंकाळी ४.३० ते ६.३०

2१८ ऑगस्ट २०२३
3१९ ऑगस्ट २०२३
4२० ऑगस्ट २०२३
5२१ ऑगस्ट २०२३
6२२ ऑगस्ट २०१३
7२६ ऑगस्ट २०२३
8२७ ऑगस्ट २०२३
9२८ ऑगस्ट २०२३
10२९ ऑगस्ट २०२३
11३१ ऑगस्ट २०२३
12१ सप्टेंबर २०२३
13०४ सप्टेंबर २०२३
14०५ सप्टेंबर २०२३
15०६ सप्टेंबर २०२३
16०८ सप्टेंबर २०२३
17१० सप्टेंबर २०२३
18१३ सप्टेंबर २०२३
19१४ सप्टेंबर २०२३

उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्राचे शहराचे नाव किमान ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करुन दिले जाईल. परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना परिक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. सदर बाबतची माहिती उमेदवारांचे मोबाईल, ई मेल लॉगइन आयडी वर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे.

हेही वाचा – जिल्हा परिषद मेगा भरती 2023 – ZP Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

One thought on “तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – 2023 – Talathi Recruitment Exam Time Table Announced

  • Aniruddha sanjay Dhore

    thanks

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.