आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र अर्ज सुरू, पहा अटी शर्ती आणि आवश्यक कागदपत्रे – Aapale Sarkar Seva Kendra Solapur District

सोलापूर जिल्ह्यातील CSC केंद्रधारकांना माहिती व तंत्रज्ञान विभाग (साप्रवि) यांचेकडील दि. 19 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देणेकामी स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरनामा प्रसिध्द करुन विहित नमुन्यात अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.

माहिती व तंत्रज्ञान विभाग (सा.प्र.वि.) यांचेकडिल दिनांक 19 जानेवारी 2018 रोजीचे शासन निर्णयान्वये CSC केंद्रधारकांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील CSC केंद्र धारकांना व त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्यांचे केंद्र सुरू नसेल परंतू जो CSC – SPV केंद्र मिळण्यासाठी विहीत केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करीत असेल अशा व्यक्तींना सुचित करणेत येते की, सदरचा जाहिरनामा, अर्जाचा विहित नमूना, अटी व शर्तीबाबतची माहिती तसेच शहरी/ग्रामीण भागाकरिता 200 रिक्त ठिकाणांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी खालील अर्जाचा विहित नमुना डाउनलोड करून त्यावरील परिपूर्ण माहिती भरुन पुढील नमूद तारखेपर्यंत अर्ज सादर करावेत.

अर्ज स्विकारण्याचा कालावधी: दि. 29.10.2021 ते दिनांक 10.11.2021 कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून).

आपले सरकार सेवा केंद्रांकरिता अर्ज सेतू संकलन, महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत मूळ अर्ज व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती दिनांक- 10.11.2021 सायं 5.00 वाजेपर्यंत समक्ष सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही. तसेच CSC केंद्रधारकांना B2C व्यवहारांच्या संख्येनुसार प्राधान्य राहिल याची नोंद घ्यावी.

अटी व शर्ती:

1. उमेदवार हा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.

2. उमेदवारांकडे संगणक ज्ञानाबाबत (MS – CIT / CCC) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

3. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य राहिल. (आधार पुरावा जोडणे आवश्यक आहे)

4. CSC ID व अस्तित्वात असणाऱ्या B2C सेवा देणाऱ्या केंद्रचालकांनी अर्ज केल्यास त्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल.

5. एका केंद्राकरिता एकापेक्षा अधिक CSC ID असणाऱ्या केंद्र चालकांनी अर्ज केल्यास केंद्राच्या उलाढाली/व्यवहारांची अधिक संख्या असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

6. महानगरपालिका/ नगरपालिका/ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

7. उमेदवार हा गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून सक्षम असला पाहिजे.

8. उमेदवाराने संगणक साहित्य व इतर अनुषंगिक साहित्य व जागा उपलब्धतेबाबत अर्जासोबत योग्य तो तपशिल जोडणे आवश्यक आहे.

9. महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबतचा दि. 19 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदींना अधिन राहून केंद्राची नियुक्ती व कार्यान्वीत केल्या जाईल. तसेच केंद्रचालकांना अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.

10. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दर पत्रक केंद्रावर प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावली इ.चे योग्य वापर, संरक्षण व जतन करणे केंद्रचालकांना बंधनकारक राहील.

11. आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसुचित ठिकाणीच चालवणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण जिल्हाधिकारी यांचे परवागनीशिवाय बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास गंभीर स्वरूपाची चुक समजून केंद्र रद्द करण्यात येईल.

12. सबंधीत अर्जदार यांना जिल्ह्यामध्ये (शहरी किंवा ग्रामीण भागात फक्त एकाच ठिकाणी नव्याने आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त केंद्रासाठी अर्ज केल्यास एकाच केंद्रास मान्यता देण्यात येईल.)

13. ग्रामीण व शहरी भागातील रिक्त ठिकाणीच्या यादीनुसारच अर्ज सादर करावा. इतर ठिकाणांसाठी मागणी केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

14. शासकीय/निमशासकीय सेवेमध्ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांनी अर्ज करु नये.

15. अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती चुकीची आढळल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येवून त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.

16. आपले सरकार सेवा केंद्रांना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल. तसेच त्यांनी केंद्राबाबत मागितलेले अहवाल तात्काळ सादर करावे लागतील.

17. शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल व चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.

18. प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्विकारायचा, कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण प्रक्रिया कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती सोलापूर यांचेकडे राखून ठेवण्यात आले आहे.

19. जाहिरनाम्यामध्ये नमूद रिक्त केंद्र कमी करणे किंवा वाढविणेचे अधिकार जिल्हाधिकारी सोलापूर यांना आहेत.

आवश्यक कागदपत्रे:

1. पदवी प्रमाणपत्र (झेरॉक्स).
2. MS – CIT/CCC प्रमाणपत्र (झेरॉक्स).
३. आधारकार्ड (झेरॉक्स).
4. पॅनकार्ड (झेरॉक्स).
5. ग्रामपंचायत/नगरपालिका/ मनपा यांचेकडील ना हरकत दाखला.
6. CSC प्रमाणपत्र (असल्यास).

आपल सरकार सेवा केंद्र – अधिसूचना सोलापूर (Aapale Sarkar Seva Kendra – Notification):

आपल सरकार सेवा केंद्र – अधिसूचना, अर्ज नमुना, आणि २०० रिक्त ठिकाणांची यादी PDF फाईल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: https://solapur.gov.in

हेही वाचा – CSC सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि त्यांच्या वेबसाईट लिंक – CSC – Digital Seva, Aaple Sarkar – MahaOnline

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.