शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज सुरु – यवतमाळ जिल्हा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसदच्यावतीने प्रकल्प क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शहरी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. घरकुलाच्या लाभासाठी दि. 20 ऑगस्ट पर्यंत संबंधित नगर पंचायत, नगरपरिषद कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरी शबरी आदिवासी घरकुल योजना – Urban Shabari Adivasi Gharkul Yojana:
पुसद प्रकल्पात जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, महागांव, उमरखेड व नेर या सात तालुक्यांचा समावेश आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना घरे उपलब्ध व्हावे याकरीता सन २०२४-२५ या वर्षात शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भागात राबवण्यात येत आहे. घरकुलाचे बांधकाम २६९ चौरस फूट ईतके आहे.
योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी २ लाख ५० हजार इतके अनुदान दिले जाणार आहे. अनुदान रक्कम ४ टप्प्यात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेचे अर्ज नगरपरिषद व नगरपंचायत येथे उपलब्ध आहेत. परिपुर्ण अर्ज दि. 29 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीत संबंधित तालुक्यातील नगरपरिषद व नगरपंचायत येथे सादर करावे.
अर्जासोबत अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही याबाबतचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, आधारकार्ड, एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे. महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षापासून रहिवासी असावा. घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. वय वर्षे १८ पूर्ण असावे. वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 3 लाख रुपये पर्यंत असावी. स्वतःच्या नावाने बँक खाते असावे. अधिक माहितीकरीता प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावे, असे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी कळविले आहे.
हेही वाचा – शबरी आदिवासी घरकुल योजना – लाभार्थी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!