सरकारी योजनावृत्त विशेष

एसटीच्या बसस्थानकांवर जादा दराने चहा-नाश्ता, ‘नाथजल’ची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार !

नाथजल या प्रकल्पाबाबत बस स्थानकातील वाणिज्य आस्थापना परवानाधारक / नाथजल वितरक गालबोट लावित असल्याच्या तक्रारी व संदेश समाज माध्यमावर झळकत आहेत. रा.प. बस स्थानकावरील कार्यरत पर्यवेक्षक व अधिकारी या बाबीकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करित असल्याचा सूर जनमाणसात दिसून येत आहे.

तसेच रा. प. अधिकृत खाजगी थांब्यांवर रु. ३०/- मध्ये चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसलेबाबतच्या तक्रारीसुद्धा जोर धरत आहेत. या कार्यालयामार्फत अधिकृत खाजगी हॉटेलचे निवडपत्र विभागास देताना, रा.प. प्रवाशांना अधिकृत खाजगी हॉटेल मालकाने रु.३०/- मध्ये चहा नाश्ता उपलब्ध करुन देण्याचे बंधन हॉटेल थांबा मालकास असल्याचे नमुद करण्यात येते.

विभागाने तसे बंधपत्र हॉटेल मालकाकडून घेतल्यानंतरच अधिकृत थांब्याचा प्रस्ताव संयुक्त समितीच्या मान्यतेस सादर करुन मान्यता देण्यात येते. रु. ३०/- मध्ये चहा-नाश्ता योजनेच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्र. राप / निवप/वाआ / ३११८, दि.०२/०१/२०१९ अन्वये कार्यवाही करणे क्रमप्राप्त असताना, प्रवाशी हितास्तव असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर विभागामार्फत / आगारामार्फत करण्यात येत नाही व नमुद योजनांची विभागामार्फत/आगारामार्फत दक्षतेने कार्यवाही न करणाऱ्या रा.प. पर्यवेक्षकांवर / अधिकाऱ्यांवरही कार्यवाही अथवा जबाबदारी निश्चित होत नाही, ही खेदाची बाब आहे.

सबब, पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत-

>

१. सर्व बसस्थानकांवर रा.प. वाणिज्य आस्थापना परवानाधारक / नाथजल वितरकाचे फेरी परवानाधारक नाथजल पाणी बाटली छापिल महत्तम विक्री किंमतीपेक्षा जादा दरात विक्री करीत आहेत किंवा कसे, याची दैनंदिन खातरजमा करण्याची जबाबदारी कर्तव्यावरील वाहतूक पर्यवेक्षकांचीच राहील. नाथजल पाणी बाटली छापिल महत्तम विक्री किंमतीपेक्षा जादा दरात विक्री होत असल्याची प्रवाशी तक्रार आल्यास तातडीने तपासणी करावी. कारवाई करण्यात हयगयपणा करताना आढळल्यास बस स्थानकावरील वाहतूक पर्यवेक्षक व आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

२. रा.प. अधिकृत खाजगी थांब्यांवर प्रवाशांना अधिकृत खाजगी हॉटेल मालकाने रु. ३०/- मध्ये चहा नाश्ता उपलब्ध करुन देणे क्रमप्राप्त आहे. सबब, या कार्यालयाचे पत्र क्र. राप / निवप / वाआ/ ३११८, दि. ०२/०१/२०१९ मध्ये नमुद केल्यानुसार अधिकृत खाजगी हॉटेल मालक कार्यवाही प्रत्यक्षात करतात किंवा कसे, याची खातरजमा मार्गतपासणी पथकांनी, वाणिज्य आस्थापना पर्यवेक्षक व विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रवास करताना / तपासणी करताना नियमितपणे करणे क्रमप्राप्त आहे. सदर योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यास, तातडीने हॉटेल व्यवस्थापनास सदर बाब निदर्शनास आणून, अनुषंगीक सुचना करुन, ज्या विभागाचे अखत्यारीत सदर अधिकृत थांबा येतो, त्या विभाग नियंत्रकास लेखी अहवाल सादर करणे आवश्यक आहे, जेणेकरुन संबंधीत खाजगी हॉटेल व्यवस्थापनावर तात्काळ कारवाई करणे शक्य होईल व भविष्यातील प्रवाशी तक्रारी टाळता येईल.

३. प्रवाशी हितास्तव राबविण्यात येणाऱ्या नमूद योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर (विभागातर्फे / आगारातर्फे ) होते किंवा कसे, याची तपासणी वेळोवेळी विभागांमार्फत / प्रदेशांमार्फत दक्षतेने करण्यात यावी. प्रवासी तक्रारीस वाव मिळू नये याकरीता, विषयात नमुद बाबींबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना विभागाने वेळोवेळी कराव्यात. नमुद सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

हेही वाचा – IRCTC ची ऑनलाईन बस तिकीट बुकिंग सेवा सुरू; अशी करा ऑनलाईन IRCTCची बस तिकीट बुक – IRCTC Bus Ticket Booking Online

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.