जिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

ZP Scheme : लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, कडवा कुट्टी यंत्र, शिलाई मशीन, गाय म्हैस, शेळीचे गट, मिरची कांडप यंत्र, अनुदानावर मिळण्यासाठी अर्ज सुरु!

जिल्हा परिषद उपकरातंर्गत २० टक्के व ५ टक्के (दिव्यांग- ZP Scheme) योजनेसाठी २०२४-२५ या आर्थीक वर्षासाठी प्रस्ताव मागविणे बाबत प्रेसनोट जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या किमान २० टक्के रक्कम अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नववौध्दांसाठी आणि ५ टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद उपकर योजना – ZP Scheme :

त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद २० टक्के उपकरातून व ५ टक्के (दिव्यांग) उपकरातून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तीना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तीक लाभ देणे करीता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालील योजना (ZP Scheme) हाती घेण्यात आलेल्या आहेत, सदरील योजना हया १०० टक्के शासकीय अनुदान व लाभार्थी हिस्सा टक्के या तत्वावर राबविण्यात येत आहेत.

जिल्हा परिषद २०% उपकरारील योजना:

अ.क्र२०% उपकरातील योजनेचे नावप्रति लाभार्थों देय अनुदानउद्दिष्ट
मागासवर्गीयांना संगणक / लॅपटॉप पुरविणे४२०००/-११९
मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे४३०७०/-९२
मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशिन पुरविणे४३०७०/-९२
मागासवर्गीयांना कडवा कुट्टी यंत्र पुरविणे२९०००/-८६
मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीन पुरविणे९३००/-३२२
मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा करीता अर्थसहाय्य देणे४००००/-१२५
मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र (पल्वालायजर) पुरविणे२००००/-१००
मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरविणे२५०००/-२००
अटी व शर्ती :

१) अर्जदार हा अनुसुचित जाती (S.C.), अनुसुचित जमाती (S.T.), विमुक्त जाती व भटक्या जमाती (V.J-N.T), विशेष मागास प्रवर्ग (S.B.C.) व नवबौध्द या घटकांतीलच असावा.

२) संगणक योजनेचा अर्जदार १२ वी उत्तीर्ण व एम.एस.सी. आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्रधारक असावा.

३) पिको फॉल शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे.

४) प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र, तहसिल कार्यालयाचे असावे.

५) ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरीता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे.

जिल्हा परिषद ५ टक्के उपकरारील दिव्यांगासाठीचे योजना:

अ.क्रयोजनेचे नावप्रति लाभार्थों देय अनुदानउद्दिष्ट 
दिव्यांग व्यक्तीना विनाअट घरकुल देण्याची योजना१,२०,०००/-४१
निराधार/निराश्रीत अतितीव्र दिव्यांगाना विनाअट निर्वाह भत्ता१०,०००/-२५०
अस्थिव्यंग व्यक्तीना स्वंयचलीत तीनचाकी सायकल (स्कूटर विध अॅडाप्शन) डिव्हायसेस फॉर डेली लिव्हींग इ१,००,०००/-३५
अटी व शर्ती :

१) ४० टक्के किवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतचे युडीआयडी प्रमाणपत्र.

२) तहसिलदार यांनी दिलेले अधिवास/रहिवासी प्रमाणपत्र

३) यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

४) आधार कार्डची झेरॉक्स

५) घरकुलासाठी ८ अ चा उतारा

६) अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा.

७) तहसिलदार यांनी दिलेले वार्षीक उत्पन्न दाखला

८) स्कूटर विथ अॅडप्शन चालविणेकरिता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना स्थायी ड्रायव्हींग अहंक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वरील विविध जिल्हा परिषद उपकरातंर्गत योजने (ZP Scheme) करिता पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव १५ जुलै २०२४ या अंतिम तारखेच्या आत संबधीत पंचायत समिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांनी केली आहे.

हेही वाचा – विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “ZP Scheme : लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, कडवा कुट्टी यंत्र, शिलाई मशीन, गाय म्हैस, शेळीचे गट, मिरची कांडप यंत्र, अनुदानावर मिळण्यासाठी अर्ज सुरु!

  • Sanjay Namdeo sargar

    Akola zp schimchj mahiti dyavi

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.