महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना; लाभार्थ्यांना मिळणार ₹ ११,००० मानधन !

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आहे. पत्रकारांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना राबवण्यात येते.

अधिस्विकृतीधारक पत्रकांराना व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदत देण्याकरिता “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” या विश्वस्त संस्थेची स्थापना दिनांक ०१ ऑगस्ट २००९ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली असून सदर निधी अंतर्गत रु. १० कोटी तसेच शासन निर्णय दिनांक ०२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू करण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली तसेच सन २०१८-१९ मध्ये रुपये १५ कोटी तसेच सन २०२१-२२ मध्ये रूपये १० कोटी असे एकूण रुपये ३५ कोटी इतकी रक्कम नरीमन पॉईट, मुंबईतील इडियन बँक या राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव स्वरुपात गुतंविण्यात आलेली आहे. इतर राज्यातील पत्रकारांना सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणारे मानधन विचारात घेता महाराष्ट्रातील पत्रकारांना या योजने अंतर्गत रु. ११,०००/- हजार दरमहा इतके अर्थसहाय्य देण्याच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने अशा घटकाला सामाजिक सुरक्षा, सुविधा देण्याचा विचार करुन ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या वृध्दावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून “आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत” ज्येष्ठ पत्रकारांना रु. ११,०००/- हजार दरमहा इतके अर्थसहाय्य देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सदर खर्च सामान्य प्रशासन विभाग, मागणी क्र. ए -६, २२२० माहिती व प्रसिध्दी, ०१ चित्रपट, ००१ – संचालन व प्रशासन (००) (०१), प्रसिध्दी संचालक (२२२० ००४३) ३१ – सहायक अनुदान (योजनांतर्गत) या लेखाशिर्षाखाली उपलब्ध करुन देण्यात आलेल्या व इंडियन बँक,
नरिमन पॉईट, मुंबई येथील बचत खात्यामध्ये मुदत ठेव स्वरूपात गुंतविण्यात आलेल्या रुपये ३५ कोटी इतक्या निधीच्या व्याजाच्या रकमेतून विनियोग करण्यात यावा.

वित्त विभाग शासन निर्णय क्र. ९ अर्थसं -२०२१/प्र.क्र.४८/अर्थ -३, दि.२४.०६.२०२१ सोबतच्या परिशिष्टामधील अनुक्रमांक ९ मधील अनिवार्य व कार्यक्रम खर्चाच्या तरतुदीपैकी ३१ वेतनेतर सहायक अनुदाने या अंतर्गत होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता घेण्यात आली असून शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता झाल्यानंतरच निधीचे वितरण करण्यात यावे.

सदर निधी आहरण करणेबाबत, लेखाधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच उपसंचालक (लेखा) यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक ६८१/ २०२१/ व्यय -४ दिनांक २७.१२.२०२१ अन्वये दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे. सदर निधी ज्या कारणासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच कारणासाठी खर्च केल्याबाबतचे “उपयोगिता प्रमाणपत्र” सादर करण्यात यावे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना अर्ज नमुना PDF फाईल :

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना अर्ज नमुना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

शासन निर्णय: “आचार्य बाळशास्त्री जाकर सन्मान योजना” अंर्तगत जेष्ठ पत्रकारांना दरमहा रु.११,०००/ इतके अर्थसहाय्य करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कलाकार मानधन योजना – Kalakar Mandhan Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.