नोकरी भरतीमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेष

अंगणवाडी सेविका मदतनीस भरती (पुणे) – Anganwadi Bharti 2023

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त नियमित अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका /अंगणवाडी मदतनीस रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र उमेदवारांकडून भरतीबाबतच्या खालील अटी व शर्तीनुसार रिक्त असलेल्या जागेबाबतचा अर्ज भरुन संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात व्यक्तीशा सादर करण्यात यावा.

अंगणवाडी सेविका मदतनीस भरती (पुणे) – Anganwadi Bharti 2023:

पदाचे नाव आणि तपशील:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका/ मिनी अंगणवाडी सेविकाकिमान 12 वी उत्तीर्ण
अंगणवाडी मदतनीसकिमान 12 वी उत्तीर्ण

एकूण जागा: 818 जागा

पदाचे नावपद संख्या 
अंगणवाडी सेविका134 पदे
अंगणवाडी मदतनीस653 पदे
मिनी अंगणवाडी सेविका31 पदे

अर्ज करणे बाबत सर्वसाधारण सूचना :-

1. अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.

2. सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या व दाखला यांच्या छायांकित प्रति ( झेरॉक्स) A-4 साईज मध्येच असाव्यात.

A- 4 पेक्षा लहान अथवा मोठया पेपर वरील असु नयेत.

3. ज्या मुददया बाबत माहिती लिहावयाची नसेल तेथे रेषा मारावी. माहिती कोरी ठेवण्यात येवु नये.

4. अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करावयाचा आहे. त्या पदाचा अर्जावर स्पष्ट उल्लेख असावा.

5. अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका या दोन्ही पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज करणेत यावेत.

6. खाडाखोड किंवा चुकिचे भरलेले अर्ज बाद केले जातील याबाबत संबंधित अर्जदारांस कोणतीही पूर्व सुचना कार्यालयामार्फत दिली जाणार नाही.

7. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या क्रमांकावर (v) अशी खुण करावी.

8. ज्या मुळ प्रमाणपत्रांची कार्यालयाने मागणी केलेली नाही परंतु अशी कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यास कार्यालय त्याची जबाबदारी घेणार नाही.

9. अर्जासोबत जोडलेल्या साक्षांकित प्रति, किंवा अन्य कागदपत्रे कोणत्याही परिस्थीतीत उमेदवारांस परत केली जाणार नाहीत. 10. अर्जासोबत जोडलेली कोणतीही कागदपत्रे अथवा प्रमाणपत्रे नंतर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर खोटी, बनावट, खाडाखोड केलेली, अवैध, संबंधित शासन आदेश / नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम अधिकाऱ्याने प्रदान न केलेली असल्याचे आढळुन आल्यास प्रकल्प कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या निवडीपासुन उमेदवारास कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात येईल. शिवाय उमेदवाराची शिफारस झाली असल्यास ती पूर्वलक्षी प्रभावाने रदद करणेत येईल. तसेच इतरही कायदे शासन नियमानुसार कारवाई करणेत येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

11. सदर भरती प्रक्रिये दरम्यान कार्यालयावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास सदर उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेमधुन रदद करणेत येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.

सोबत जोडावयाच्या सहपत्रांची यादी :-

1. स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला.

2. अपत्याबाबत (लहान कुटुंब) असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला

3. नांवा वावत प्रतिज्ञापत्र (मा. तहसिलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत

4. शाळा सोडलेचा दाखला / प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत.)

5. उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी सो. यांचेकडील जातीचा दाखला. (साक्षांकित प्रत ) (अ.जा./अ.ज./ वि. भ.जा/भ. ज. / इ.मा.व./वि.मा.प्र. / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग)

6. उमेदवार सेविका पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असावा व मदतनीस पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असावा. (साक्षांकित गुणपत्र प्रत.)

7. आधार कार्ड, (साक्षांकित प्रत )

8. रेशनिंग कार्ड, (साक्षांकित प्रत)

9. विधवा असलेस पतीच्या मृत्युचा दाखला व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला / अनाथ असलेस संबंधित संस्थेचा दाखला.

10. किमान वय 18 ते 35 वर्षे

11. नियमित अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मिनी सेविका / मदतनीस म्हणुन कमीत कमी 02 वर्षांचा अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील अनुभवाचा दाखला. या प्रयोजनासाठी खाजगी संस्थेतील सेवा अनुभव ग्राहय धरणेत येणार नाही. अशी खाजगी संस्था मान्यताप्राप्त अथवा अनुदानित संस्था असली तरीही अशा संस्थांमधील अनुभव गुणांकनासाठी ग्राहय धरणेत येणार नाही.

अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका /अंगणवाडी मदतनीस भरती जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.