सरकारी योजना

मुंबई शहर कामगार उप-आयुक्तांमार्फत घरेलू कामगारांना माहिती अद्ययावत करण्याबाबत आवाहन

महाराष्ट्र घरेलु कामगार मंडळ अधिनियम, २००८ कलम 10 अन्वये घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत नोव्हेंबर 2011 ते 31 मार्च 2014 पर्यंत घरेलू कामगारांची नोंदणी मॅन्युअल पध्दतीने करण्यात आली होती. मॅन्युअल नोंदणी दरम्यान घरेलू कामगारांचे बँकेचे तपशील घेण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या कालावधीत आणि यानंतर नोंदणी केलेल्या सर्व घरेलू कामगारांनी आपली माहिती http://public.mlwb.in/public या लिंकवर अद्ययावत करावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच नोंदणी करतांना अडचण आल्यास कामगार उप आयुक्त कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – घरेलू कामगार नोंदणी, अर्जाचा नमुना, कागदपत्रे, व घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

>
शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.