स्पर्धा परीक्षावृत्त विशेष

ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, राज्यात एकूण ७०.१३ टक्के निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे. त्या विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालकांनी केले आहे.

सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात येते. या परीक्षेची गुणपत्रिका https://dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १४ नोव्हेंबरनंतर मिळणार आहे.

तसेच, ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे, त्यांनी प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी १० रूपये याप्रमाणे शुल्क व अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाठवावेत. यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असे ग्रंथालय संचालकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा निकाल जाहीर २०२२ – MahaTET Exam Result

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

>

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.