जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत शिलाई मशीन, पिठाची गिरणी साठी अर्ज सुरू !
महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना (DBT) द्वारे राबविण्यासाठी अटी व शर्तीच्या अधिन राहुन ग्रामिण भागातील महिला व मुली यांचे कडुन अटी व शर्ती नुसार दिनांक 09/02/2024 ते 22/02/2024 या कालवधी अर्ज घ्यावायाचे आहे. योजनांचे नाव खालील प्रमाणे आहे.
1. ग्रामिण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे.
2. ग्रामिण भागातील महिला व मुलींना पिक्को व फॉल मशिन पुरविणे.
जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत शिलाई मशीन, पिठाची गिरणी साठी अर्ज सुरू !
या योजनांशी संबधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबतच अर्जाचे प्रारुप जोडलेले आहे. अटी व शर्तीची पुर्तता करणारे पात्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत व पडताळणी करून दि. 23/02/2024 रोजी अर्जासह विहीत नमुन्यातील Soft Copy व Hard Copy कार्यालयास सादर करावी,
जिल्हा परिषद सेस २०२३-२४ वैयक्तिक लाभाच्या योजना (DBT) करिता शर्ती व अटी
१. अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न १,२००००/ चे आत असावे यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र / दाखला सन २०२२-२३ या वर्षाचे जे मार्च २०२४ पर्यंत वैध असेल ते जोडावे. अर्जासोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र / दाखला नसल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
२. अर्जदार हे ग्रामिण भागातील रहिवाशी असावा.
३. अर्जदार हे शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य त्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडावे,
४. जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा. अर्जदाराने या पुर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषद च्या इतर विभाग अगर या विभागा कडून मागील ५ वर्षात लाभ घेतलेला नसावा. योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आल्यास त्या बाबतची वसुली संबंधित लाभार्थी यांच्या कडून केली जाईल.
५. अर्ज परीपुर्ण असावा अपूर्ण अर्ज / विनास्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाही. किंवा त्या बाबत कोणताही पत्र व्यव्हार केला जाणार नाही.
६. लाभार्थी ही ग्रामीण भागातील असावी तीचे वय १७ ते ४५ असावे, अर्ज सादर करण्याच्या दिवशी १७ पेक्षा कमी व ४५ पेक्षा जास्त नसावे.
७. मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचाच लाभार्थी निवडी करिता विचार केला जाईल. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थीती मध्ये विचार केला जाणार नाही.
८. निधीच्या उपलब्धते नुसार योजनेचा लाभ दिला जाईल त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी यांना लाभ मिळेलच असे नाही या बाबत लाभार्थी निवडीचा संपूर्ण अधिकार हा महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद बुलडाणा यांनाच असेल.
९. लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य (सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी अपंग लाभार्थी यांना शासन निर्णया नुसार सुट.
१०. लाभार्थी लाभ घेत आहे त्याच्या नावे वैयक्तिक बँक बचत खाते असावे व ते राष्ट्रीय कृत बँकेचेच असावे त्या बचत खात्याला लाभार्थ्यांचे आधार नंबर लिंक केलेला असावा (IFSC कोड नमुद असावा)
११. अर्जदाराचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत / निमशासकिय सेवेत / जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य नसावी या बाबत ग्रामसेवक यांचा दाखला अंर्जा सोबत जोडण्यात यावा.
१२. अर्जासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वतः सांक्षाकित करुन या प्रमाणे जोडण्यात यावीत.
१. अर्जदार यांचा वयाचा दाखला / TC झेराक्स प्रत.
२. अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत रेशनकार्ड झेराक्स आवश्यक.
३. अर्जदार शेतकरी आत्महत्या ग्रस्त / अपंग / विधवा/दारिद्र्य रेषा खालील असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र.
४. आधार कार्ड झेराक्स प्रत.
५. बँक बचत खात्याचे पुस्तकाचे पहिल्या पानाची झेराक्स प्रत IFSC कोड नमुद असावा.
६. इलेक्ट्रीक बील (विज बीलाची प्रत आवश्यक)
जिल्हा परिषद बुलढाणा सेस फंड योजना अर्ज नमुना: जिल्हा परिषद बुलढाणा सेस फंड योजना अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!