नांदेड जिल्हा योजनावृत्त विशेषसरकारी योजना

मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज सुरु – नांदेड जिल्हा

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. यासाठी पात्र व्यक्ती / संस्थाकडुन अर्ज मागविण्यात आली आहेत.

मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज – नांदेड जिल्हा:

योजनेची वैशिष्टे:

 1. मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण,
 2. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान.
 3. 50 टक्के स्वगुंतवणुक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी/ विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा,
 4. मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता:

 1. वैयक्तीक माधपाळ पात्रतेसाठी अर्जदार साक्षर असावा.
 2. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य.
 3. वय 18 वर्षापेक्षा जास्त
 4. 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
 5. केंद्र चालक प्रगतशील मधपाळ व्यक्ती पात्रतेसाठी किमान 10 वी उत्तीर्ण,
 6. वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे एक एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असावी.
 7. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
 8. केंद्रचालक संस्था पात्रतेसाठी संस्था नोंदणीकृत असावी.
 9. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी.
 10. एक एकर शेत जमिन स्वमालकीची / भाडयाने घेतलेली असावी.
 11. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत.
 12. अटी व शर्तीमध्ये लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील.
 13. मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, उद्योग भवन, एमआयडीसी परिसर शिवाजीनगर, नांदेड या कार्यालयाशी भ्रमणध्वनी क्रमांक 9921563053 किंवा दुरध्वनी क्रमांकावर 02462-240674 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

हेही वाचा – मधुमक्षिका पालन योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.