वृत्त विशेषसरकारी योजनास्पर्धा परीक्षा

‘बार्टी’ मार्फत फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज सुरु ! Apply Online for Barti Fellowship

सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

BANRF-2021 अंतर्गत एकूण 200 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे. याअंतर्गत एम.फिल/ पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना RGNF/NFSC च्या धर्तीवर JRF साठी रु. 31000/- व SRF साठी रु. 35000/- प्रतिमहा प्रमाणे अधिछात्रवृत्ती रक्कम तसेच वार्षिक आकस्मिक खर्च, घरभाडे रक्कम देण्यात येते.

एम.फिल साठी एकूण 2 वर्ष, पीएच.डी. साठी एकूण 5 वर्षे तसेच एम.फिल / पीएच.डी (Integrated Course) एकूण 5 वर्षे अधिछात्रवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येते.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बार्टीचे अधिकृत संकेतस्थळ https://barti.maharashtra.gov.in ला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

हेही वाचा – HDFC बढते कदम स्कॉलरशिप – HDFC Badhte Kadam Scholarship 2022-23

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.