BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने (BMC Bharti) अर्ज मागविण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर ‘कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन अर्ज’ या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
“कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने (BMC Bharti) अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती – BMC Bharti :
जाहिरात क्र.: MPR/7814
एकूण : 1846 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कार्यकारी सहायक (लिपिक) | 1846 |
एकूण | 1846 |
शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (BMC Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for BMC Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – RRB JE Bharti : भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!