उद्योग उर्जा व कामगार विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

Cashew processing industry Grant Fund : काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन अनुदान !

राज्यातील काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन अनुदान (ashew processing industry Grant Fund) देण्याबाबत शासनाने दि. १५/०७/२०१० च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेतला आहे. तसेच दि. १२/०३/२०१३ च्या शासन निर्णयान्वये काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन अनुदान वाटपाची सुधारीत कार्यप्रणाली निश्चित करुन ही योजना पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सदर योजनेनुसार राज्यामध्ये उत्पादीत व प्रक्रिया केलेल्या काजूपैकी राज्यामध्ये अंतिमतः विक्री झालेल्या काजूच्या विक्रीवर देय असलेल्या ५% मूल्यवर्धित कर भरल्यानंतर सदर कराची रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून संबंधित घटकांना प्रदान करण्यात येत होती. तथापि दि. ०१/०७/२०१७ पासून मूल्यवर्धित कराऐवजी वस्तू व सेवा कर आकारण्याची (GST) नवीन कार्यप्रणाली सुरु झाली.

सदर कर रचनेच्या पार्श्वभूमीवर दि. ०२/१२/२०२० च्या शासन निर्णयान्वये सदर योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान वाटपाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. राज्यामध्ये उत्पादीत व प्रक्रीया केलेल्या काजुपैकी अंतिमतः विक्री झालेले काजू विक्रीवर ५ टक्के वस्तु व सेवा कर आकारण्यात येत असून त्यामध्ये SGST (२.५ टक्के) आणि CGST (२.५ टक्के) आहे.

काजुप्रक्रीया उद्योग घटकांनी GST भरल्यानंतर त्यापैकी १०० टक्के ढोबळ राज्य वस्तु व सेवा कर (Gross SGST) दि. ०१/०४/२०२० पासून प्रोत्साहन अनुदान म्हणून काजू प्रक्रीया उद्योगास अनुज्ञेय करण्यात आले आहे. तसेच दि. ०९/०६/२०२१ च्या शासन निर्णयान्वये दि. ०१/०४/२०२० पासूनचे दावे सादर करण्यास शासनाने दि. ३०/०६/२०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यास अनुलक्षून उद्योग संचालनालयामार्फत सादर केलेल्या अहवालानुसार काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन अनुदान या योजनेअंतर्गत एकूण ६० दावे निकाली काढयाकरीता रु. १,६६,००,०००/- एवढ्या निधीची आवश्यकता आहे.

काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन अनुदान – Cashew processing industry Grant Fund:

काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन योजनेअंतर्गत (२८५२ ०४८१) प्रलंबित असलेले दावे निकाली काढण्याकरीता बिम्स प्रणालीवर वितरणाकरीता या योजनेअंतर्गत लेखानुदानाच्या मर्यादेत रु. १.६६ कोटी इतका निधी उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीच्या अधीन वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

बीडीएस प्रणालीवर उपलब्ध असलेला निधी विचारात घेऊन, शासन निर्णय / परिपत्रकातील तरतुदी, निकष, पात्रता इत्यादींची पडताळणी/शर्तीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची खात्री करुन घेण्याच्या अटीच्या अधीन राहून, उपलब्ध असलेला रुपये १,६६,००,०००/- (रुपये एक कोटी सहासष्ट लाख फक्त) इतका निधी खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या ६० काजू प्रक्रिया उद्योग घटकांना वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय: सन 2024-25 या वर्षाकरीता काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन या योजनेअंतर्गत निधी (Cashew processing industry Grant Fund) वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – काजू फळपिक विकास योजना – Cashew Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.