वृत्त विशेषमहसूल व वन विभागमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

महसुली प्रकरणांच्या ‘अ’ आणि ‘ब’ फाईलींची सविस्तर माहिती !

आपण या लेखामध्ये फाईल ‘अ’ आणि फाईल ‘ब’ म्हणजे काय याची सविस्तर माहिती घेणार आहोत. सरकारी कामांमध्ये महसूल अधिकाऱ्यांना कामकाज करतांना अनेक प्रकरणे हाताळावी लागतात. अनेक प्रकरणांमध्ये सुनावणी घ्यावी लागते. महसूल अधिकाऱ्यांसमोर दाखल होणाऱ्या किंवा सुनावणीला येणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये काही अत्यंत महत्वाची आणि काही कमी महत्वाची कागदपत्रे दाखल होत असतात. हि कागदपत्रे खूप महत्वाची असतात. अशी महत्वाची आणि कमी महत्वाची कागदपत्रे एकत्रपणे, एकाच फाईल किंवा संचिकेमध्ये ठेवल्यामुळे अशा संचिकेचा आकार अनावश्यकपणे मोठा दिसतो. तसेच सुनावणी किंवा तपासणीच्यावेळी किंवा तातडीच्या प्रसंगी एखाद्या मुद्द्यासाठी अशा संचिकेतील सर्वच पाने चाळावी लागतात अणि यात वेळ वाया जातो.

महसुली प्रकरणांच्या ‘अ’ आणि ‘ब’ फाईलींची सविस्तर माहिती:

अनेक महसुली प्रकरणांची फाईल ‘अ’ आणि फाईल ‘ब’ अशा दोन फायलींमध्ये विभागणी करण्यात येते. याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका, खंड तीन, प्रकरण तीन, नियम आठ मध्ये सविस्तर वर्णन केले आहे.

फाईल ‘अ मध्ये काय असते?

फाईल ‘अ’ मध्ये अत्यंत महत्वाची कागदपत्रे असतात. असे वर्गीकरण केल्यामुळे महसूल अधिकाऱ्यांला कागदपत्र आणि दस्तऐवज तपासून पाहणे सोपे जाते.

फाईल ‘अ’ आणि फाईल ‘ब’ यामध्ये विभागणी केल्यामुळे मुख्य फाईल मधील अनेक अनावश्यक भाग काढून टाकला जातो आणि वादाच्या मुद्द्यांचा निर्णय लावण्याच्या दृष्टीने फक्त महत्त्वाचे असे कागदपत्र आणि दस्तऐवज तपासून पाहणे महसूल अधिकाऱ्यांला सोपे जाते. प्रकरणाची प्रगती होईल त्याप्रमाणे महसुली प्रकरणांची ‘अ’ आणि ‘ब’ फाईलींमध्ये विभागणी करण्याची पद्धत अनुसरणे हिताचे ठरते.

फाईल ‘ब’ मध्ये काय असते?

फाईल ‘ब’ मध्ये कमी महत्त्वाची आणि प्रकरण अभिलेख कक्षामध्ये पाठविल्यानंतर त्यामधून निरुपयोगी म्हणून काढून टाकावयाची, स्मरणपत्रे, पोहोच पावत्या यांसारखे कमी महत्त्वाची कागदपत्रे असतात.

फाईल ‘अ’ आणि फाईल ‘ब’ मध्ये ठेवण्यात येणारी कागदपत्रे:

फाईल ‘अ’ मधील कागदपत्रे:

१. ज्याच्या आधारे प्रकरण दाखल करण्यात आले आहे तो अर्ज, अहवाल किंवा आदेश आणि इतर कागदपत्रे. (सात-बारा, फेरफार, आठ-अ इत्यादि)

२. प्रकरणाची सुनावणी चालू असतांना दाखल करण्यात आलेले किंवा प्रकरण निकालात काढण्यासाठी मागविण्यात आलेली इतर कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज किंवा अहवाल.

३. नोटीस प्रदर्शित केल्याची, बजावल्याची पोहोच, अहवाल इत्यादि.

४. संबंधित व्यक्तींकडून प्राप्त झालेले उत्तर किंवा इतर लेखी निवेदने.

५. जमिनीचे नकाशे, मोजमाप, आराखडे, आकारणी यासंबंधीची कागदपत्रे.

६. अभिलेख कार्यालयाचा अहवाल.

७. संबंधित व्यक्ती आणि अधिकारी यांनी सादर केलेली कागदपत्रे.

८. लवादाचे निवाडे.

९. स्थानिक चौकशीचे अहवाल.

१०. विक्री विषयक कागदपत्रे आणि विक्रीच्या उद्घोषणा.

११. निष्पादित केलेली बंधपत्रे.

१२. महसूल अधिकार्यांनी घेतलेले जबाब.

१३. मूळ व अपील शाखेचे निर्णय.

१४. महसूल अधिकाऱ्यांला महत्त्वाची वाटतील अशी इतर कोणतीही कागदपत्रे.

फाईल ‘ब’ मधील कागदपत्रे:

१. वाद प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसलेल्या मुद्द्यांबाबतचे अर्ज.

२. साक्षीदारांना उपस्थित राहण्यासंबंधी पाठवलेल्या नोटीस.

३. सुनावणीसाठी मुदत मागण्याचे संबंधितांचे विनंती अर्ज.

४. संबंधितांना पाठविलेली स्मरणपत्रे, कारणे दाखवा नोटीस, विलंबाबाबतची स्पष्टीकरणे.

५. प्रकरणातील कागदपत्रांच्या नकला मिळण्यासाठीचे अर्ज.

६. मूळ दस्तऐवज परत मागण्यासाठीचे अर्ज.

७. अभिलेख अहवाल किंवा शेरा मागणारे अर्ज.

८. कुलमुखत्यार पत्र, वकील पत्र.

९. मूळ वादपत्राची जादा प्रत.

१०. वादाच्या मुद्द्यांच्या दृष्टीने महत्त्वाची नसलेली इतर कागदपत्रे.

एका वर्षाच्या कालावधीनंतर ‘ब’ फाईलीची फेरिस्त (यादी) करून त्याचे नाशन करण्यात यावे.

हेही वाचा – गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.