महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन २०१८-२०१९ मधील कांदा अनुदान आयसीआयसीआय बँकेकडे शिल्लक असलेल्या व त्यावर प्राप्त झालेल्या व्याजाच्या रकमेमधून वितरीत करण्यास मान्यता

शासन निर्णय, दिनांक २६ डिसेंबर, २०१८ अन्वये सुरुवातीस राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व प्रसन्न कृषी मार्केट, पाडळी आळे या खाजगी बाजार समितीमध्ये १ नोव्हेंबर, २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱ्यांना रुपये २०० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत कांदा अनुदानाचा कालावधी वेळोवेळी वाढविण्यात आला असून सुधारित अंतिम कालावधी दिनांक १ नोव्हेंबर, २०१८ ते २८ फेब्रुवारी, २०१९ असा निश्चित करण्यात आला आहे.

कांदा अनुदान योजनेसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी पुढीलप्रमाणे आहे:-

शासन निर्णय, दिनांकउपलब्ध निधीजिल्हालाभार्थी
16-02-2019आकस्मिकता निधीरुपये ११४.८०००१७ जिल्हे१,६०,६९८
07- 08- 2019पूरक मागणीरुपये ३८७.३०३११९ जिल्हे३,९३,३१७
24-01-2020पूरक मागणीरुपये २.३०२९२ जिल्हे२,५३२
16-06-2020आयसीआयसीआय बँकेकडे जमा झालेल्या व्याजामधूनरुपये ०.२७२३४ जिल्हे१७६
01-11-2022पूरक मागणीरुपये २.६४६०१ जिल्हे११७२
21-03-2022पूरक मागणीरुपये ७.४७००१ जिल्हे८०७४
 एकूणरुपये ५१४.७९४३५,६५,९६९

शासन निर्णय, दिनांक १९/८/२०१९ अन्वये आयसीआयसीआय बँकेमार्फत कांदा अनुदान वितरित करण्यास मान्यता देताना वित्त विभागाने नमुद केलेल्या अटी व शर्तीमध्ये अट क्रमांक ॥ पुढील प्रमाणे आहे:-

अट क्रमांक ॥ “सदर बचत खात्यातून प्राप्त होणाऱ्या व्याजाचा वापर सदर योजनेच्या अंमलबजावणी करिताच करण्यात यावा.”

>

आयसीआयसीआय बँकेमध्ये जमा केलेल्या निधीतून १६ मार्च २०२२ अखेर रुपये ९९.५८ लाख इतकी रक्कम ( अखर्चित रक्कम व व्याज) पणन संचालनालयाच्या खात्यात जमा झालेले आहे.

पणन संचालनालयाने दिनांक १०/१२/२०२० च्या पत्रान्वये सांगली जिल्ह्यातील ७६२ पात्र लाभार्थ्यांसाठी रुपये ७६,६४,३१४ इतका निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

वित्त विभागाने व्याजाची रक्कम योजनेच्या अंमलबजावणीकरिता वापरण्यास परवानगी दिलेली आहे. यास्तव पणन संचालनालयाच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात अखर्चित असलेली रक्कम आणि सदर रकमेवर प्राप्त झालेल्या व्याजाची रक्कम सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या कांदा अनुदानासाठी वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन २०१८-२०१९ मधील कांदा अनुदान आयसीआयसीआय बँकेकडे शिल्लक असलेल्या व त्यावर प्राप्त झालेल्या व्याजाच्या रकमेमधून वितरीत करण्यास मान्यता:-

आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात अखर्चित असलेली रक्कम आणि सदर रकमेवर प्राप्त झालेल्या व्याजाचा विनियोग कांदा अनुदानासाठी करणे आवश्यक असल्याने, सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित कांदा अनुदान आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात अखर्चित असलेली रक्कम आणि सदर रकमेवर प्राप्त झालेल्या व्याजातून वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

  • सदर अनुदान आयसीआयसीआय बँकेमार्फत अदा करण्यात यावे.
  • सांगली जिल्ह्यासाठी वितरित करावयाच्या कांदा अनुदान तपशिल पुढीलप्रमाणे आहे:-
अ. क्र.जिल्हालाभार्थी संख्यावितरीत करावयाचे अनुदान
1सांगली76276,64,314
एकूण76276,64,314

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय : सन २०१८-२०१९ मधील कांदा अनुदान आयसीआयसीआय बँकेकडे शिल्लक असलेल्या व त्यावर प्राप्त झालेल्या व्याजाच्या रकमेमधून वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.