वृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी योजना

आर.टी.ई. २५ % ऑनलाईन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे – R.T.E. 25% Online Admission Process (Year:- 2022 – 2023) Documents Required for Admission

आर.टी.ई. २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (वर्ष:- २०२२ – २०२३) साधारण २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया ही सरकारी योजना असून, याद्वारे मुलांना मोफत प्रवेश मिळतो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे आधारकार्ड लागण्याची शक्यता आहे. मात्र, मुलांकडे आधारकार्ड नसल्यास, ते प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला येत्या दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेत मुलांचे आधार कार्ड स्वीकारण्याबाबतच्या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून सूचना आल्यानंतर, प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

आर.टी.ई. २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (वर्ष:- २०२२ – २०२३) प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे – R.T.E. 25% Online Admission Process (Year:- 2022 – 2023) Documents Required for Admission:

आर.टी.ई. २५ % ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतचीच असावीत त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

अ.क्र.कागदपत्राचा प्रकारवैध कागदपत्रांची सूची
रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा (सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता)रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना) वीज टेलिफोन बिल देयक, पाणी पट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक निवासी पुराव्याकरिता गॅस बुक रद्द करण्यात आलेले आहे. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
2वंचित जात सवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र वडिलांचे / बालकाचे )उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांचे जात प्रमाणपत्र. पालकाचा (वडिलांचा / बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही.
3दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रेजिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधीक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय याचे ४० टक्के आणि ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
4HIV बाधित/ प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रेजिल्हा शल्य चिकित्सक (वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र
5आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखलातहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, salary स्लीप कंपनीचा किंवा Employer चा दाखला, (आर्थिक वर्ष २०२० – २०२१ किंवा २०२१-२०२२ मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले) उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राहय धरण्यात येणार नाही.
6जन्माचा दाखला (सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता)ग्रामपंचायत /न.पा./ म.न.पा. यांचा दाखला रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला / आंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला / आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन.
7घटस्फोटित महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे1) न्यायालयाचा निर्णय. २) घटस्फोटित महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
8न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे1) घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा. २)घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा/ बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
9विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे1) पतीचे मृत्यूपत्र ( प्रमाण पत्र) २) विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
10एकल पालकत्व असल्यास (single parent) आवश्यक कागदपत्रेआई किंवा वडील या पैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे ग्राह्य
11अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे१) बालगृह / अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. २)जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील

अधिकृत वेबसाईट: https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex / https://student.maharashtra.gov.in

 

हेही वाचा – सरकारी योजना किंवा सरकारी कामे असो; मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स! Best 3 Mobile Apps for Government Schemes and Works

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.