वृत्त विशेष

घरगुती गॅस १०० रुपयांनी स्वस्त

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपये कपातीची घोषणा करण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या काही आठवडे आधी, महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही भेट दिली आहे. नवी दिल्लीत शुक्रवार किंवा शनिवारच्या मध्यरात्रीपासून विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपये होईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

राज्यांमधील स्थानिक करांनुसार गॅस सिलिंडरची किंमत वेगळी असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेल आणि वायूच्या किमती कमी झाल्यामुळे ही कपात शक्य झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजच्या महिला दिनी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी  कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल  असे ते  म्हणाले.

मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या २३ महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी कपात आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी ऑगस्टच्या उत्तरार्धात सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे सिलिंडरची नऊ वर्षांच्या उच्चांकी किंमत ११०३ रुपयांवरून ९०३ रुपयांपर्यंत खाली आली होती, आता हा दर ८०३ रुपये करण्यात आला आहे.

“आज, महिला दिनी, आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती १०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषतः नारी शक्तीचा फायदा होईल,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, प्रति सिलिंडर ३०० रुपये अनुदान मिळते. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर अनुदान ३०० रुपये मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली.

“महिला दिनाचे औचित्य साधून आज आम्ही एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपये सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या नारी शक्तीचे जीवन सुखकर करण्याबरोबरच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भार देखील कमी होईल. या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणात देखील मदत होईल आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील.

स्वयंपाकाचा गॅस आणखी परवडणारा बनवून,  कुटुंबांच्या कल्याणाला हातभार लावण्याचे आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.  हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे जीवन सुखकर बनवण्याप्रती आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे.”

हेही वाचा – घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांचे अधिकार

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.