नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस !
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते—कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी दुष्काळ. अशा वेळी शासनाकडून मिळणारी मदत म्हणजे मोठा आधार. परंतु ही मदत वेळेवर आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हे सारं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आता सरकारने नुकसान भरपाई आधार प्रमाणीकरण (E-Panchnama KYC) ही नवी आणि जलद प्रणाली लागू केली आहे.
या नवीन पद्धतीमुळे लाभार्थी शेतकऱ्यांना मदतीचा निधी थेट बँक खात्यात (Direct Benefit Transfer – DBT) जमा केला जातो आणि आधारद्वारे (E-Panchnama KYC) ओळख पडताळणी झाल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या चुका, डुप्लिकेट नावे, गैरवापर किंवा विलंब टाळता येतो. Maharashtra MAHAIT द्वारा विकसित केलेली ही प्रणाली अत्यंत उपयुक्त आणि पारदर्शक आहे.
नुकसान भरपाई आधार प्रमाणीकरण का आवश्यक? (E-Panchnama KYC):
पूर्वी नुकसान भरपाईचे प्रस्ताव → मान्यता → निधी वितरण → तहसील कार्यालय → कोषागार → लाभार्थी असे अनेक टप्पे असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत पोहोचायला खूप वेळ लागत असे.
अनेकदा नावांतील चुका, खाते क्रमांकातील चुका, लाभार्थ्यांच्या ओळखीतील तफावत अशा समस्यांमुळे निधी परत जात असे.
मात्र आता:
संगणकीय प्रणाली
आधार प्रमाणीकरण (E-Panchnama KYC)
VK List (विशिष्ट क्रमांक यादी)
CSC किंवा आपले सरकार केंद्र येथे फिंगरप्रिंट/OTP पडताळणी
आणि थेट खात्यात मदत
या सर्वांमुळे प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक झाली आहे.
नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस – E-Panchnama KYC:
नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी (E-Panchnama KYC) आधार प्रमाणीकरण ऑनलाईन करण्यासाठी खालील महाऑनलाईन CSC च्या वेबसाईट ओपन करा.
https://cscservices.mahaonline.gov.in/DashBoard/Login.aspx
तुमच्याकडे लॉगिन करण्यासाठी CSC VLE युजर आयडी, पासवर्ड नसेल तर जवळच्या CSC सेंटर किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्रा मध्ये जाऊन ऑनलाईन (E-Panchnama KYC) आधार प्रमाणीकरण करू शकता.
महाऑनलाईन CSC ची वेबसाईट ओपन झाल्यावर युजर आयडी, पासवर्ड टाकून लॉगिन करा.

पोर्टल मध्ये लॉगिन झाल्यावर प्रथम आपली मराठी भाषा निवडा. त्यानंतर डाव्या बाजूला “आधार प्रमाणीकरण” मध्ये “नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान मदत” या पर्यायावर क्लीक करा.

मदत व पुनर्वसन विभागाची पोर्टल ओपन होईल त्यामध्ये Vishisht Kramank मध्ये तलाठी यांच्याकडे लाभार्थी विशिष्ठ क्रमांक मिळेल तो टाकून सर्च करा.

विशिष्ट क्रमांक सर्च केल्यानंतर लाभार्थ्यांचे खालील तपशील आपल्याला पाहायला मिळेल.
- विशिष्ट क्रमांक
- शेतकऱ्याच गाव
- गट क्र.
- तोटा चा प्रकार
- बाधित क्षेत्र हेक्टर
- वितरीत केलेली रक्कम
- आधार नुसार शेतकऱ्याचे नाव
- शेतकरी आधार नं.
- बँकेचे नाव
- बचत खाते क्र.
- शाखा IFSC कोड
मोबाईल क्र.
पुढे आधार प्रमाणीकरण (E-Panchnama KYC) बाबतीमध्ये कोणतीही तक्रार असेल तर निवड करायची आहे किंवा तक्रार नसेल तर No grievance निवडून आधार प्रमाणीकरण करण्याच्या परवानगीसाठी बॉक्स मध्ये टिक करा आणि मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून OTP/बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करा.

आधार प्रमाणीकरण (E-Panchnama KYC) झाल्यानंतर आपल्याला त्याची पावती मिळेल त्याची आपण प्रिंट काढू शकता. या प्रोसेस नंतर आपल्याला अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल.
आधार प्रमाणीकरणात तक्रार असल्यास?
जर VK List मधील तपशील चुकीचे असतील:
CSC केंद्रावरून तक्रार नोंदवता येते.
तक्रार थेट तहसीलदार कार्यालयाकडे जाते.
दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा आधार पडताळणी करावी लागते.
या लेखात, आम्ही नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण (E-Panchnama KYC) ऑनलाईन प्रोसेस ! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
- अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC करणे अनिवार्य; अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही !
- अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी !
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
- किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- आंबिया बहार फळ पीक विमा योजना : फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- E-Peek Pahani DCS App : ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – PoCRA Scheme.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!


आधार प्रमाणीकरण झाले आहे नंतर कळले की बँक डिटेल्स चुकले आहे तर पैसे दुसर्याच्या अकाऊंट नंबर ला जातील का
OTP पण येत नाही आणि बायोमेट्रिक ने अंगठा पण येत नाही अशा वेळेस काय पर्याय आहे
कारण बरेच वयस्क लोकांचे हे प्राब्लेम आहेत
दुसरी गोष्ट या साठी CSP वाल्यांना किती पैसे द्यायचे कारण ते 50 पासून 100 रुपया पर्यंत प्रत्येकी घेत
Kyc jali aahe pan ajun piase jama nahi jale
मुख्य म्हणजे kyc केल्यानंतर साधारण किती दिवस – किती महिन्यात पैसे जमा होतात ते सांगाल का म्हणजे दुसरी शेती परत खराब होण्याच्या आत येतात की त्या दुसऱ्या नैसर्गिक आपत्तीची वाट पाहत बसावे…
ज्यांची kyc झाली त्यांचे पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे.
नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
https://www.msdhulap.com/nuksan-bharpai-status/