महामेष योजना लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी जाहीर !
महामेष योजने अंतर्गत राज्यातील अर्जदारांकडुनऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यात राबविणेकरिता मान्यता देण्यात आलेली होती. सदर योजनेसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून नवीन लाभधारक निवड प्रक्रिया राबवून लाभधारक निवडले आहेत.
स्थायी आणि स्थलांतरित मेंढीपालन करणाऱ्या मेंढीपालकांना पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप केले जाईल, तसेच सुधारित प्रजातींच्या नर यांचे ७५% अनुदानावर वाटप करणे (केवळ या योजने अंतर्गत वरील मेंदी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थीकरिता). मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान. ( केवळ या योजनेअंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थीकरिता). मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान (केवळ या योजने अंतर्गत वरील मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु ज्यांच्याकडे स्वतःच्या या आहेत अशा लाभार्थीकरिता). कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान आणि पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान दिले जाईल.
अनेक जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करायला सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.
महामेष योजना लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी: महामेष योजना लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाइन: फोन नंबर: 020-25657112, ईमेल- mdsagpune@gmail.com
मार्गदर्शक सूचना: राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – गायी म्हशी गट वाटप योजना : लाभार्थ्यांना 02 दुधाळ देशी / 02 संकरीत गायी / 02 म्हशींचा एक गट मिळणार!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!