कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

शेतकरी योजनांच्या अर्जासाठी नवीन महाडीबीटी वेबसाईट लॉंच !

महाराष्ट्र राज्यात कृषि विषयक २५ पेक्षा अधिक योजनांचा लाभ महाडिबीटी पोर्टलद्वारे शेतक-यांना ऑनलाईन पद्धतीने मिळत आहे. शेतक-यांना महाडिबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी अर्ज करण्यापासून ते अनुदानाचा लाभ मिळणेपर्यंत https://mahadbtmahait.gov.in/Farmer/login/login URL उपयोग केला जात होता. परंतु महाडिबीटी पोर्टलवरील तांत्रिक कारणास्तव पोर्टलच्या URL मध्ये बदल करण्यात आलेला आहे.

नवीन URL https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/login/login याप्रमाणे राहील. तरी नवीन URL बाबत क्षेत्रिय स्तरावरील कृषि कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयांनी नवीन URL बाबत प्रसिद्धीपत्रक दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्यात यावे.

तसेच महाईसेवा केंद्रे, गावपातळीतील बैठका, गावातील कृषिफलक यांच्याद्वारे शेतक-यांना नवीन URL बाबत माहिती प्रसारित करावी.

राज्यातील सर्व शेतक-यांना सदर परिपत्रकाद्वारे आवाहन करण्यात येते की, नवीन URL वरील महाडिबीटी पोर्टलवर जाऊन शेतकरी योजना या सदराखाली विविध लाभाच्या घटकांसाठी नोंदणी करावी.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.