पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 13 डिसेंबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाज बांधवासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सुरु केलेली आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी 25 हजार उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. जिल्ह्यातील धनगर समातातील पात्र लाभार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत 31 जानेवारी, 2024 पर्यंत सादर करण्याचे असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना
विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या 24 जानेवारी, 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत 31 जानेवारी, 2024 पर्यंत सादर करण्याचे असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.
हेही वाचा – मोदी आवास घरकुल योजना : 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!