वृत्त विशेष

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास ऑनलाईन कसा काढायचा? (Universal Travel Pass)

लोकल रेल्वे प्रवासासाठी ई-पास सेवा सुरू करण्यात आली असून ई-पास मिळवण्यासाठी ​राज्य सरकारने युनिव्हर्सल ट्रॅव्हेल पास सिस्टम विकसित केली आहे. राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करता यावा यासाठी ई-पास सेवा सुरू केली आहे. सर्वसामान्यांना ई-पास अगदी सहज उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारने युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास सिस्टम विकसित केली आहे.

लसीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी सहज ई-पास उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारने Universal Travel Pass वेबलिंक उपलब्ध केली आहे. ही बेवसाईट सुरू झाली असून याद्वारे सर्वसामान्य ई-पास मिळवू शकणार आहेत. ही वेबलिंक सर्वच ब्राउझर्सवर उघडू शकणार आहे. नागरिकांनी या बेवलिंकवरून ई-पास डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास ऑनलाईन काढायचा? (Universal Travel Pass)

लसीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास ऑनलाईन काढण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि  युनिव्हर्सल पास वेबसाईट ओपन झाल्यावर आपली मराठी भाषा निवडा.

https://epassmsdma.mahait.org

मुख्य पानावर “लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या लोकांसाठी युनिव्हर्सल पास” या पर्यायावर क्लिक करा.

लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या लोकांसाठी युनिव्हर्सल पास
लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या लोकांसाठी युनिव्हर्सल पास

पुढे कृपया COWIN App मध्ये नोंदणी करतांना वापरलेला मोबाइल नंबर टाकून त्यावर ओटीपी येईल तो टाका आणि “नोंदणी करा” वर क्लिक करा.

मोबाइल नंबर
मोबाइल नंबर

पुढे आपण पाहू शकतो आपले नाव, मोबाईल नंबर,लसीकरणाचा संदर्भ क्रमांक आणि आपण घेतलेल्या दुसऱ्या लसीची तारीख, पुढे “Action” या मेनू मध्ये “Generate Pass” वर क्लिक करा.

Generate Pass
Generate Pass
 • Generate Pass वर क्लिक केल्यानंतर पुढे आपली माहिती दिसेल ती तपासा आणि “Upload Image” वर क्लिक करून आपला फोटो अपलोड करा.
 • I confirm uploaded photo is good for universal pass and need no changes” टिक करा.
 • Apply (लागू करा) वर क्लिक करा.
Universal Travel Pass
Universal Travel Pass

आता तुमचा पास २४ तासाच्या आत मध्ये तयार होईल, पास तयार झाल्यावर मोबाईलवर मेसेज येईल.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास डाउनलोड करा (Universal Travel Pass – Download):

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास डाउनलोड काढण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://epassmsdma.mahait.org

 • मोबाइल नंबर टाकून त्यावर ओटीपी येईल तो टाका.
 • पुढे “Action” या मेनू मध्ये “ViewPass” वर क्लिक करा.
 • ViewPass” वर क्लिक केल्यानंतर पासच्या खाली डाउनलोड बटन वर क्लिक करून पास डाउनलोड करा.

असा मिळवा मासिक रेल्वे पास:

जेव्हा तुम्ही मासिक रेल्वे पास काढण्यासाठी रेल्वे स्थानकात जाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेला Universal Travel Pass ई-पास तिकिट खिडकीवर दाखवावा लागणार आहे. त्यानंतर त्या आधारे तुम्हाला मासिक पास मिळेल. या पद्धतीत ऑफलाइन पडताळणी करण्याची आवश्यकता असणार नाही. एकदा का ऑनलाईन Universal Travel Pass मिळवला की मग लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस उलटून गेले आहेत अशी व्यक्ती रेल्वे प्रवास करू शकणार आहे. ज्या व्यक्तीला पास हवा आहे अशाची लसीबाबतची पडताळणी ही आपोआपच होणार आहे.

या लिंकमुळे वेगळी पडताळणी करण्याची आवश्यकता नसल्याचेही राज्य सरकारने जाहीर केली आहे. लसीचे दोन डोस घेतले आहे मात्र १४ दिवस झालेले नाहीत अशा व्यक्तीने पाससाठी प्रयत्न केले तरी देखील त्यांना त्यांचा पास १४ दिवस झाल्यानंतर मिळणार आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास ऑनलाईन कसा काढायचा? (Universal Travel Pass)

 • Pramod J Shinge

  What about the Indian nationals who returned from US with both doses of vaccine (Pfizer) taken be able to apply for Universal E pass

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.