उद्योगनीतीकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

१३ क्रेडिट-लिंक सरकारी योजनांसाठी जन समर्थ पोर्टल योजना सुरु – JanSamarth National Portal for Credit-Linked Government Schemes

पंतप्रधानांनी  ‘पतसंलग्न सरकारी योजनांसाठी, जनसमर्थ पोर्टल’हे राष्ट्रीय पोर्टल सुरू केले. ‘पतसंलग्न सरकारी योजनांसाठी जनसमर्थ पोर्टल’ हे राष्ट्रीय पोर्टल सुरू करणे हे याच दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. हे पोर्टल विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांचे जीवनमान  सुधारेल आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यास मदत करेल,असेही ते म्हणाले.

गुंतवणुकीच्या संधींबाबत माहितीसाठी इन्व्हेस्ट इंडिया पोर्टल, व्यवसाय औपचारिकतेसाठी एक खिडकी मंजुरी  पोर्टलबद्दल त्यांनी  माहिती दिली. ‘याच मालिकेत  हे जनसमर्थ पोर्टल देशातील तरुण आणि स्टार्टअप कार्यक्षेत्राला सहाय्य्य करणार आहे’, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. जन समर्थ हा सर्वसामान्य नागरिकांना सक्षम करण्याचा आणि सुविधा देण्यासाठीचा सामान्य जनतेच्या सेवेचा एक भाग आहे.”

जनसमर्थ हे 13 क्रेडिट लिंक्ड सरकारी योजना एकाच व्यासपीठावर जोडणारे डिजिटल पोर्टल आहे. लाभार्थी काही सोप्या चरणांमध्ये पात्रता डिजिटल पद्धतीने तपासू शकतात, पात्र योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि डिजिटल मान्यता मिळवू शकतात.

१३ क्रेडिट-लिंक सरकारी योजनांसाठी जन समर्थ पोर्टल योजना – JanSamarth National Portal for Credit-Linked Government Schemes:

13 सरकारी योजनांचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने अर्ज सादर करण्यासाठी आणि 125+ वित्तीय संस्था ( एमएलाय ) (सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह) निवडण्यासाठी” जन समर्थ” पोर्टल  एक खिडकी सुविधा प्रदान करते. सीबीडीटी,जीएसटी, उद्यम (युडीवायएएम), एनईनसेल, युआयडीएआय, सीआयबीआयएल  इत्यादींसोबत प्रत्यक्ष त्या त्या वेळी पडताळणी झाल्यामुळें  कर्जाची जलद प्रक्रिया सुनिश्चित होते.”जन समर्थ” पोर्टल कृषी, उपजीविका आणि शिक्षण या श्रेणीतील  सरकारी योजनांअंतर्गत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देईल.

जन समर्थ पोर्टलवर 13 सरकारी योजना आधीपासूनच आहेत आणि आणखी योजना समाविष्ट केल्या जातील. जन समर्थ” पोर्टल पात्रता तपासेल, तत्वतः मंजुरी देईल आणि निवडलेल्या बँकेकडे अर्ज  पाठवेल. हे पोर्टल प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर लाभार्थ्यांना अद्यतनित ठेवेल. बँकेच्या शाखांना अनेकदा  भेट देण्याची गरज राहणार नाही.

१) शैक्षणिक कर्ज योजना:

 1. केंद्रीय क्षेत्र व्याज अनुदान योजना – Central Sector Interest Subsidy (CSIS).
 2. पढो परदेश योजना – Padho Pardesh.
 3. डॉ. आंबेडकर सेंट्रल सेक्टर योजना – Dr. Ambedkar Central Sector Scheme.

२) कृषी पायाभूत सुविधा योजना :

 1. कृषी-क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना (एसीएबीसी) Agri-Clinic and Agribusiness Centers Scheme (ACABC).
 2. कृषी विपणन पायाभूत सुविधा – Agricultural Marketing Infrastructure (AMI).
 3. कृषी पायाभूत सुविधा निधी – Agriculture Infrastructure Fund (AIF).

३) व्यवसाय कर्ज योजना:

 1. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना – Prime Minister’s Employment Generation Program (PMEGP).
 2. विणकर मुद्रा योजना – Weavers Mudra Scheme (WMS).
 3. पंतप्रधान मंत्री मुद्रा योजना – Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY).
 4. पीएम स्वानिधी (पीएम स्ट्रीट वेंडर आत्मानिर्भर निधी) योजना – PM SVANidhi (PM Street Vendor’s AtmaNirbhar Nidhi) Scheme
 5. मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सच्या पुनर्वसनासाठी स्वयं-रोजगार योजना – Self-Employment Scheme for Rehabilitation of Manual Scavengers (SRMS).
 6. स्टँड अप इंडिया योजना – Stand Up India.

४) उपजीविका कर्ज योजना:

 1. दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) Deendayal Antyodaya Yojana-National Rural Livelihoods Mission (DAY-NRLM).

कर्जासाठी कोण अर्ज करू शकतो?

कोणीही कर्जासाठी अर्ज करू शकतो. प्रथम, तुम्हाला तुमच्या आवश्यक कर्ज श्रेणी अंतर्गत पात्रता तपासण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही पात्र असल्यास, तुम्ही ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकता.

कागदपत्रांची आवश्यकता काय आहे?

वरील प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असते. पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, आधार क्रमांक, मतदार आयडी, पॅन, बँक स्टेटमेंट इत्यादी मूलभूत कागदपत्रे आवश्यक असतील. अर्जदाराने पोर्टलवर काही मूलभूत तपशील देखील प्रदान करणे आवश्यक आहे.

१३ क्रेडिट-लिंक सरकारी योजनांसाठी जन समर्थ पोर्टल वरून अर्ज कसा करायचा?

१३ क्रेडिट-लिंक सरकारी योजनांसाठी जन समर्थ पोर्टल वरून अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम खालील लिंकवर क्लिक करून पोर्टल ओपन करा.

जन समर्थ पोर्टल: https://www.jansamarth.in/

सध्या, वरील प्रमाणे चार कर्ज श्रेणी आहेत आणि प्रत्येक कर्ज श्रेणी अंतर्गत विविध योजना सूचीबद्ध आहेत. तुमच्या पसंतीच्या कर्ज श्रेणीसाठी, तुम्हाला प्रथम काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन पात्रता तपासण्याची आवश्यकता आहे आणि एकदा तुम्ही कोणत्याही योजनेंतर्गत पात्र झाल्यानंतर, तुम्ही डिजिटल मान्यता प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे निवडू शकता.

योजनेसाठी पात्रता तापसण्यासाठी पोर्टलवरील मुख्य मेनू मध्ये schemes वर क्लिक करून Check Eligibility वर क्लिक करा. तुम्ही पात्र असल्यास, तुम्ही नोंदणी करून क्रेडेंशियल्ससह साइन-इन करा आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकता.

कर्ज अर्जाची स्थिती तपासा:

अर्जदार वेब पोर्टलवर कर्ज अर्जाची स्थिती तपासू शकतो. नोंदणी क्रेडेंशियल्ससह साइन-इन करा, स्थिती तपासण्यासाठी डॅशबोर्डवरील my applications टॅबवर क्लिक करा.

ईमेल: [email protected]
संपर्क: +91 79690-76111

हेही वाचा – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांनी उद्योग कर्जासाठी ऑनलाईन करा अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.