मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण Ladaki Bahin Yojana’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये (Ladaki Bahin Yojana Marathi Form Update) अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत – Ladaki Bahin Yojana Marathi Form Update:
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील (Ladaki Bahin Yojana Marathi Form Update) अर्जाचा विषय चर्चेला आला होता. परंतू ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडविली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. मराठीमधील (Ladaki Bahin Yojana Marathi Form Update) अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.
लाडकी बहीण योजना काय आहे?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकानं जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही. तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, प्रतिवर्ष 18 हजार रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय?
- महाराष्ट्र रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
- 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
- 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
- घरात कोणी Tax भरत असेल तर
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
- कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
- कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)
कोणती कागदपत्रं लागणार?
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
नारीशक्ती दूत ॲप वरून ऑनलाईन अर्ज करा (Apply Online on Narishakti Doot App) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये लाभासाठी नारीशक्ती दूत ॲपवरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
लाडकी बहीण योजना वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करा (Apply Online on Ladaki Bahin Portal) : लाडकी बहीण योजना वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय:
- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण – CM Majhi Ladki Bahin Yojana योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत (दि. २८ जून २०२४) चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत (दि. ३ जूलै २०२४) चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत (दि. १२ जूलै २०२४) चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा होणार ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे; दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!