लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा सुरु !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रलंबित हप्त्याचा लाभ वितरणाच्या दुसरा टप्प्याची (Ladki Bahin Yojana 2nd phase benefit distribution) प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे.
ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा (Ladki Bahin Yojana 2nd phase benefit distribution) 31 ऑगस्ट पर्यंत होणार आहे, तरी सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची आधार सिडींग करुन ई – केवायसी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन शासनामार्फत केले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा सुरु ! Ladki Bahin Yojana 2nd phase benefit distribution:
राज्यातील अनेक महिला लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या पैकी आधार सिडींग नसलेल्या लाभार्थ्यांना व्यक्तीशा बँकेत / पोस्टात जाऊन आधार सिडींग करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच नव्याने प्राप्त अर्जही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अंतिम मंजुरीने शासनाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील महिलांना प्रत्येकी 3 हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे. आधार सिडींग करुन ई – केवायसी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापपर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी आधार सिडींग करुन ई – केवायसी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती अॅप मधून अर्ज दाखल करुन घेतले होते. ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र, राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत, असे आदेश दिले होते.
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)
खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधित महत्वपूर्ण लेख वाचा !
- लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये आले नाही तर हे काम करा !
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज !
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय :
- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण – CM Majhi Ladki Bahin Yojana योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!