मतदार कार्डसोबत आधार क्रमांक जोडणी उपक्रम 1 ऑगस्ट पासून सुरु!
भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 नुसार मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून एच्छिकपणे आधारची माहिती संग्रहीत करणे बाबतच्या अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्या सूचना प्राप्त झालेल्या असून सदर सूचनांची अंमलबजावणीसाठी नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी करत आहेत.
मतदार यादीत असलेल्या प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहीत स्वरुपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. तसेच अधिसूचना 17 जून 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि. 1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्र. 6 ब मध्ये भरुन देऊ शकतो.
आवश्यक अर्ज क्रं. 6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच अर्ज क्र. 6 ब मा. भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in व मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधारक्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रं. 6 ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध करुन देण्यात येईल.
सदर आधार जोडणीचा उद्देश मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. आधारक्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे.
अर्ज क्रं. 6 ब BLO यांचे मार्फतही घरोघरी भेटी देऊन गोळा करण्यात येईल. विशेष शिबिराच्या आयोजनामधूनही अर्ज क्रं. 6 ब गोळा करण्यात येईल.
मतदारांकडे आधारक्रमांक नसल्यास अर्ज क्रं. 6 ब मध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रापैकी एक कागदपत्र सादर करता येईल. उदा. पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, इपिक कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र.
मतदार यादीशी आधारक्रमांकाची जोडणी करणे ऐच्छिक आहे, केवळ आधार सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून नाव काढून टाकली जाऊ शकत नाही. तरी मतदार यादीतील नावाशी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करुन घेण्याबाबत सर्व मतदारांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, आवाहन करत आहेत.
हेही वाचा – डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर – EPIC Digital Voting Card
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!