वृत्त विशेषकृषी योजनासरकारी योजना

अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी २०२१-२०२२ (पूर/भूस्खलन लाभार्थी यादी) – List of beneficiaries (Flood/Landslides year 2021-2022)

महाराष्ट्र राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी अनुदान हे राज्य शासनातर्फे देण्यात येत आहे. आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर या याद्या अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.

या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागांसाठी २५,००० रु. प्रति हेक्टर असे अनुदान हे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

यासाठी जुलै महिन्या मध्ये झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख तर ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीकरिता ४ हजार ८६४ कोटी असे एकूण ५ हजार २२१ कोटी रुपये इतका निधी आपदग्रस्तांना मदत म्हणून उपलब्ध करून देण्यात आले.

जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानिकरिता दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३६५ कोटी ६७ लाख रुपये, ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना दि. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये १४ जिल्ह्याकरिता रू. २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये तर २७ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ९ जिल्ह्याकरीता रू. ७७४ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून मदतीचे वाटप सुरू झाले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करताना २१ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याचे काम सुरु आहे. हि मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी याद्या प्रकाशित कराव्यात अशा सूचना शासफ`नाने दिल्या आहेत. या अनुसरून वेगवेगळ्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करायला सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.

शासन निर्णय: ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने उर्वरित मदत वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी २०२१-२०२२ (पूर/भूस्खलन लाभार्थी यादी):

प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आपण या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गूगल मध्ये रत्नागिरी लिहा तुम्हाला रत्नागिरी डॉट nic.in किंवा gov.in ची वेबसाईट ओपन करायची आहे.

https://ratnagiri.gov.in

वेबसाईट ओपन झाल्यावर प्रथम वरती मराठी भाषा निवडा आणि सर्च मध्ये “अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी”/FLOODS 2021 असे लिहून एंटर प्रेस करा किंवा मुख्य मेनू मध्ये दस्तऐवज (Documents) मध्ये “२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी”/जुलै २०२१ मधील पूरस्थिती व दरड कोसळणे यासाठी अनुदान वाटप केलेल्या लाभार्थ्यांची यादी आपण पाहू शकतो.

नंतर तुम्हाला काही याद्या दिसतील त्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी २०२१-२०२२ ची यादीच्या लिंकवर क्लिक करून ओपन करून तुमचे नाव आहे का ते चेक करा.

माहितीसाठी खाली काही जिल्ह्यांच्या लिंक देत आहे.

 1. रत्नागिरी जिल्हा लाभार्थी यादी
 2. सिंधुदुर्ग जिल्हा लाभार्थी यादी
 3. उस्मानाबाद जिल्हा लाभार्थी यादी
 4. ठाणे जिल्हा लाभार्थी यादी
 5. बीड जिल्हा लाभार्थी यादी
 6. कोल्हापूर जिल्हा लाभार्थी यादी
 7. पुणे जिल्हा लाभार्थी यादी
 8. नंदुरबार जिल्हा लाभार्थी यादी
 9. औरंगाबाद जिल्हा लाभार्थी यादी
 10. नांदेड जिल्हा लाभार्थी यादी
 11. सांगली जिल्हा लाभार्थी यादी
 12. जळगाव जिल्हा लाभार्थी यादी
 13. धुळे जिल्हा लाभार्थी यादी
 14. यवतमाळ जिल्हा लाभार्थी यादी
 15. सातारा जिल्हा लाभार्थी यादी

हेही वाचा – बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.