कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

पशुपालक शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड – Livestock farmers will get Kisan Credit Card

नंदुरबार जिल्ह्यातील पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या संयुक्त विद्यमाने 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत किसान क्रेडिट कार्ड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.

केंद्र सरकार व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत दुग्ध व्यावसायिक, शेळीपालक अथवा कुक्कुट पालन करणारे पशुपालक ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, अशा जिल्ह्यातील 7 हजार 702 एवढ्या पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

ज्या पशुपालकांकडे शेती असेल त्यांच्याकडील किसान क्रेडीट कार्डची पतमर्यादा वाढवून मिळेल. परंतु व्याज सवलत फक्त 3 लक्ष पर्यंतच्या कर्जासाठी राहील. कर्जाकरीता व्याज सवलत दर 2 टक्के राहील, तर वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याज सवलतीचा लाभ देण्यात येईल. ही योजना पशुपालनासाठी खेळते भांडवल उपलब्ध होणे करता असून खालील प्रमाणे खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे.

  1. एका गायीस 12 हजार रुपये.
  2. एका म्हशीसाठी 14 हजार रुपये.
  3. शेळी गट 10+1 करीता 12 हजार 500 रुपये ते 20 हजार रुपये.
  4. 100 ब्रॉयलर कुक्कुट पक्षी करीता 8 हजार रुपये.
  5. लेयरसाठी 15 हजार रुपये.
  6. गावठी पक्षांकरीता 5 हजार रुपये.

हे खेळते भांडवल जनावरांचे पशुखाद्य, औषध उपचार तसेच विमा आणि तत्सम खर्चाकरीता उपलब्ध होणार असून यामुळे पशुपालकाला आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यासाठी हातभार लागणार आहे. या योजनेतंर्गत आतापर्यंत 600 अर्ज प्राप्त झाले असुन त्यावर जिल्हा अग्रणी बँकेमार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे कोणत्याही तारणाशिवाय पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादा (खेळते भांडवल) रु.1 लाख 60 हजार आहे. परंतु जो पशुपालक शेतकरी सहकारी दूध सोसायटी, दूध संघ, दूध उत्पादक कंपनीशी संलग्न आहे आणि कर्ज परत करण्याचा त्रिपक्षीय करार (दूध सोसायटी, संघ, बँक आणि पशुपालक) करुन कर्ज परत करण्याची हमी देत असेल त्यांना कोणत्याही तारणाशिवाय 3 लाख रुपयांच्या मर्यादेत पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड योजनेचा लाभ घेता येईल.

ही योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदीकरीता नसून त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे. योजनेची अधिक माहिती व अर्ज नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभाग अथवा जवळच्या बँक शाखेत उपलब्ध आहेत.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.