वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

MHT CET २०२२ प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु – MHT CET Online Registration

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याकरिता आणि अधिक माहितीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कळविले आहे.

MHT CET २०२२ प्रवेश नोंदणी:

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी – सीईटी -२०२२ ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावायचे आहेत.

संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे.गुरुवार, दिनांक १०/०२/२०२२ ते गुरुवार, ३१/०३/२०२२ (रात्री ११.५९ वा.)
विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे (विलंब शुल्क रुपये ५००/- सर्व प्रवर्गाकरिता)शुक्रवार, दिनांक ०१/०४/२०२२ ते गुरुवार, ०७/०४/२०२२ (रात्री ११.५९ वा.)
शुल्क भरून अर्ज निश्चित करणेगुरुवार, ०७/०४/२०२२ (रात्री ११.५९ वा. )

टिप: दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत प्रवेश निश्चिती आणि परीक्षा शुल्क भरलेले असतील त्यांना कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही याची संबंधितानी नोंद घ्यावी.

एमएचटी सीईटी २०२२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता महत्वाच्या सुचना

 • एमएचटी सीईटी २०२२ साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी एमएचटी सीईटी २०२२ साठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे सखोल वाचन करावे.
 • उमेदवाराने इयत्ता १० वी किंवा इयत्ता १२ वी च्या गुणपत्रीकेवरील नाव अर्ज भरताना त्याचं क्रमाने नमूद करावे.
 • उमेदवाराने स्वतःचा फोटो व सही योग्य पद्धतीने व योग्य Size मध्ये अपलोड करावे.
 • उमेदवाराने जर राखीव प्रवर्गामधून परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केला असेल, तर प्रवेश प्रक्रीयेपूर्वी खालील नमुद प्रमाणपत्रे तयार ठेवावीत १. जात प्रमाणपत्र २. जात वैधता प्रमाणपत्र ३. Non creamy layer certificate
 • उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा करण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून भरलेली माहिती योग्य आहे याची खातरजमा करावी.
 • भरलेल्या माहिती मध्ये बदल करण्यासाठी Edit सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
 • उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा केल्या नंतर भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
 • उमेदवाराने परीक्षा केंद्रांची निवड काळजीपूर्वक करावी.
 • कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही.
 • उमेदवाराने अर्ज भरताना PCM किंवा PCB किंवा दोन्ही ग्रुपची नोंद काळजीपूर्वक करावी.
 • उमेदवारास परीक्षा देण्याकरिता प्रश्न पत्रिका इंग्रजी/मराठी/उर्दू या भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उमेदवाराने अर्ज भरताना प्रश्न पत्रिकेची योग्य ती भाषा निवडावी.
 • उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा केल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट व अदा केलेल्या शुल्काची पावती प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे.
 • उमेदवाराने विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
 • एमएचटी सीईटी २०२२ परीक्षेच्या अनुषंगाने या कार्यालयतर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या जाहीर सुचनाच्या माहितीसाठी उमेदवाराने या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्यावी.
 • उमेदवाराने कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे Login Id व Password इतर व्यक्ती सोबत share करू नये.
 • उमेदवाराने परीक्षा अर्ज भरताना स्वतःचा मोबाईल नं. व ई – मेल आयडी द्यावा, जेणेकरून परीक्षेबाबतच्या सुचना संबंधित मोबाईल नं. वर sms द्वारे पाठविण्यात येतील.
 • उमेदवारास अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन नं. वर संपर्क साधावा.

MHT CET २०२२ प्रवेश अर्ज ऑनलाईन कसा करावा ?

स्टेप 1 : MHT CET 2022 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://mhtcet2022.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

स्टेप 2 : पुढे New Registration येथे क्लिक करा.

स्टेप 3 : आता I Accept and Proceed >>>वर क्लिक करा.

स्टेप 4 : त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.

स्टेप 5 : MHT CET 2022 application form भरण्यासाठी अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.

स्टेप 6 : त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.

स्टेप 7 : तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून घ्या.

सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधीत विद्यार्थी/पालक/संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी.

MHT CET २०२२ प्रवेश अधिसूचना:

MHT CET २०२२ प्रवेश अधिसूचना, नोंदणी सूचना,  अर्ज कसा करावा त्यासाठी माहिती पुस्तिका, अभ्यासक्रम आणि मार्किंग योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

हेल्पलाइन क्रमांक: (10:00 AM to 06:00 PM) +91-8975857462, +91-8856860692, +91-8857834644, +91-8857954644, +91-9028625695 ई-मेल : mhtcet22.cetcell@gmail.com संकेतस्थळ: http://www.mahacet.org

हेही वाचा – १२वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करा – Online Download HSC Board Exam Hall Ticket

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.