वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२-२३ – Mini Tractor Subsidy Scheme Nanded

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी शासनाच्यावतीने योजना तयार करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेसाठी इच्छुक पात्र बचतगटांनी दि. शनिवार 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावीत. या अर्जाची सत्यप्रत सहायक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड येथे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सन २०२२-२३ – Mini Tractor Subsidy Scheme:

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेचे लाभाचे स्वरूप: बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु. 3.१५ लाखांची आर्थिक मदत.

>

अटी व शर्ती:

१) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत.

२) स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८०% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत.

३) ट्रॅक्टर व त्याच्या उप्साधानांच्या खरेदीवर रु. ३.१५ लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील.

४) ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.

अर्ज करण्याचे व लाभाचे मुख्य टप्पे:

  1. ऑनलाइन अर्ज सादर करणे – बचत गटाची व सदस्यांची संपूर्ण अचूक माहिती भरून अर्ज ऑनलाइन सादर करणे.
  2. सारांश प्रिंट सादर करणे – आपण सादर केलेला अर्ज वैध झाल्यास या अर्जाची सारांश प्रिंट सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाइन सादर करावी.
  3. लाभार्थी निवड – वैध झालेल्या सर्व अर्जामधून चिठ्ठी च्या मदतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल .
  4. बिलाची पावती सादर करणे – लाभार्थ्यांनी खरेदी केलेय साहित्याची व वाहनाची पावती ऑनलाइन सादर करणे. सादर केलेल्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांक, पावती क्रमांक, खरेदी दिनांक, वाहनाचा चेसीस क्रमांक, उप साधनांचे अनु क्रमांक, इत्यादी विस्तृत तपशील असणे गरजेचे आहे. मूळ (ओरीजनल) खरेदी पावती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.
  5. वाहन परवाना सादर करणे – लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनाचा RTO मार्फत मिळणारा वाहन परवाना ऑनलाइन सादर करणे. मूळ (ओरीजनल) वाहन परवाना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

संपर्क: संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

हेही वाचा – कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.