वृत्त विशेषसरकारी योजना

‘एनएसएफडीसी’ योजनेतंर्गत सुविधा कर्ज योजनेसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ! – NSFDC Scheme

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2023-2024 या आर्थिक वर्षात एनएसएफडीसी योजनेतंर्गत सुविधा कर्ज योजना अंतर्गत 5 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना अंतर्गत 1 लाख 40 हजार रुपये, महिला समृध्दी योजना अंतर्गत 1 लाख 40 हजार रुपये यासह शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते.

मांग, मातंग समाजातील व तत्सम 12 पोट जातीतील दारिद्र्य रेषाखालील महिला आणि पुरुष स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देणे हा या योजनांचा उद्देश आहे.

‘एनएसएफडीसी’ योजनेतंर्गत सुविधा कर्ज योजनेसाठी अटी – NSFDC Scheme:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे व ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार हा मातंग समाजाच्या १२ पोट- जातीतील असावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्यांच्याकडे असावा.
  • केंद्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण/शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ३,००,०००/- पर्यंत असावे.
  • राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ३,००,०००/- पर्यंत असावे.
  • अर्जदाराने या महामंडळातून व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

मातंग समाजातील गरजू शहरी, ग्रामीण भागातील लाभार्थी, तसेच परितक्ता, विधुर, दिव्यांग, निराधार व्यक्तींना या योजनेसाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थ्यांनी खालील संकेतस्थळावर ऑनलाईनद्वारे अर्ज करुन एक प्रत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना – Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.