या शेतकऱ्यांना काजू बी साठी अनुदान मंजूर!
“राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे (Kaju Bi Anudan)” या योजनेस मान्यता दिलेली आहे. काजू बी साठी अनुदान (Kaju Bi Anudan) योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी सन २०२४ च्या काजू हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बी साठी प्रति किलो रु. १०/- याप्रमाणे किमान ५० किलो व कमाल २००० किलो या मर्यादेत शासन अनुदान (Kaju Bi Anudan) देण्यात येणार आहे.
काजू बी साठी अनुदान (Kaju Bi Anudan) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य काजू मंडळ यांनी पत्रान्वये केलेल्या मागणीनुसार, चालू आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित झालेल्या रु. १०.०० कोटी इतक्या निधी पैकी रु. ३.३६५२ कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान – Kaju Bi Anudan:
“राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी (Kaju Bi Anudan) शासन अनुदान (Kaju Bi Anudan) देणे” या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात रु. ३.३६५२ कोटी निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
“राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान (Kaju Bi Anudan) देणे” या योजनेसाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीत व वितरीत करावयाच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
योजनेचे नाव | अर्थसंकल्पित निधी | चालू वर्षी वितरीत निधी | आता वितरीत करावयाचा निधी |
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे | १०. | ० | ३.३६५२ |
शासन निर्णयाव्दारे उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी पात्र काजू उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर महाराष्ट्र राज्य काजू मंडळामार्फत थेट जमा करण्यात येईल.
या शासन निर्णयाव्दारे उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी ज्या कारणास्तव मंजूर केलेला आहे, त्याच कारणासाठी विनियोग करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांनी खात्री करावी आणि यासंदर्भातील अनुपालन अहवाल व निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तत्परतेने सादर करावे.
वित्त विभागाच्या दि. १२.०२.२०२५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार विहीत केलेल्या अटींची पूर्तता होत असल्याने, सदर परिपत्रकान्वये या विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय :
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान (Kaju Bi Anudan) देणे या योजनेसाठी निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग नुकसान भरपाईसाठी असा करा क्लेम आणि लाभ मिळवा – PMFBY Crop Insurance Claim
- प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत फळपिक विमा योजना !
- आंबिया बहार फळ पीक विमा योजना : फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- काजू पिकावरील कीड रोग व्यवस्थापन !
- नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
- वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी या गोष्टी करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!