वृत्त विशेषसरकारी योजना

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना – अकोला जिल्हा

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना ही योजना महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत भोजन, निवास, व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या आधार संलग्र बॅंक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते.

पात्रतेचे निकषः-

1. विद्यार्थी हा भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील असावा.

2. अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.

3. विद्यार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

4. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे; त्या शहरातील हा विद्यार्थी रहिवाशी नसावा .

5 विद्यार्थी इयत्ता 12 नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व इयत्ता 12 वी मध्ये किमान 60% गुण प्राप्त असावे.

6. केंद्र शासनाच्या पोस्टमॅट्रिक शिष्यवृती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल, तथापि 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभासक्रमासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही.

7. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकल परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात/ संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.

8. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याचे कमाल वय 28 पेक्षा जास्त नसावे.

9. विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. करिता भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी उपरोक्त नमूद शासन निर्णय दि. 06/09/2019 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज सादर करावा.

10. अर्जदारने त्याचे बॅंक खाते आधारसंलग्र करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद, अकोला. महाराष्ट्र राज्य. (७२४) २४३ – ५२१३
ईमेल आयडी- [email protected]

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.