वृत्त विशेषउद्योगनीती

रंगीत भात लागवड! सर्वसामान्यांनी याचा वापर आहारात कसा करावा? जाणून घ्या सविस्तर!

सद्य:स्थितीमध्ये भातशेती मधून मिळणारे दरडोई उत्पन्न कमी असल्याने तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण आणि पाऊस आणि त्यात होणारे बदल यामुळे उत्पन्नात घट होते. या परिस्थितीत रंगीत भात (Rangit Bhat Lagwad) हे एक वरदान ठरले आहे.

रंगीत भात लागवड – Rangit Bhat Lagwad:

भात हे जास्त पावसात तग धरणारे एकमेव पीक आहे. या पिकाच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी रंगीत भात (Rangit Bhat Lagwad) लागवड प्रायोगिक तत्वावर केली असून त्याचे बाजारातील आजचे दर कमीत कमी रू.120 ते जास्तीत जास्त रु.350 प्रति किलो आहे. त्याचे पोषणमूल्य साध्या भातापेक्षा खूप जास्त आहे. मधुमेही, हृदयरोगी, लकवा, संधीवात, सोरायसिस, उच्च रक्तदाब, कॅन्सर इ. आजार असलेल्या व्यक्ती तसेच लहान बालके, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता या सर्वांसाठी उपयुक्त असून त्यात पोषण तत्वे उच्च प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्याच्या लागवडीचे नियोजन केले होते.

या भाताची वैशिष्ट्ये:-

1. नेहमीच्या भातापेक्षा रंगीत (Rangit Bhat) भातामध्ये Antocyninचे प्रमाण खूप जास्त आहे. Antocynin हे एक प्रकारचे Antioxident आहे. ज्यामुळे माणसाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

2. रंगीत (Rangit Bhat) भात ग्लुटेन फ्री असल्याने वाढते वजन, मधुमेह, अल्सर व इतर अनेक आजारांमध्ये उपयुक्त असून आहारामध्ये समावेश करण्यासाठी अत्यंत योग्य आहे.

3. यातील प्रोटीनचे प्रमाण 4-12 टक्के व लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम उच्च प्रमाणात आहे.

4. साखर व मेद फॅट या भातामध्ये नसल्याने वजन घटविण्यासाठी रंगीत (Rangit Bhat) भात चांगला असून या संदर्भात अनेक संशोधन व चाचण्या सुरू आहेत.

5. पूर्वी राजघराण्यात दीर्घायुषी होण्यासाठी रंगीत (Rangit Bhat) भाताचा वापर केला जात असे.

सर्वसामान्यांनी याचा वापर आहारात कसा करावा:-

रंगीत (Rangit Bhat) भात शिजविण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याकरिता तो प्रथम 4 तास भिजवून मगच नेहमीपेक्षा डबल शिट्टया देवून शिजवावा. ज्यांना यासाठी वेळ नसेल त्यांनी या भाताचे पिठ करून त्यापासून बनविलेल्या भाकरीचा समावेश आहारात करावा. या पिठापासून डोसा, आप्पे, घावणे, उत्तपा, इडली बनविणे सहज सोपे आहे.

रंगीत (Rangit Bhat) भातापासून पांगल, गोड भात, खिचडी, खीर, बिर्याणी, पुलाव, पापड, कुरडया, लाडू सुध्दा बनविता येतात. सध्या बाजारात याचे पोहे, मुरमुरे, पिठे उपलब्ध आहेत. त्याचा वापर लहान मुलांसाठी केल्यास त्याच्या विविध रंगांमुळे व चवीमुळे निश्चितपणे आवडेल.

रायगड जिल्ह्यात हा प्रयोग कशा पध्दतीने राबविला:

याचे बियाणे छत्तीसगड मधील आणि आपल्या राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आत्मा योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण बाबीखाली शेतकऱ्यांपर्यंत दिले गेले. उत्तर रायगडमध्ये या भाताचा प्रयोग जास्त यशस्वी झाला नाही मात्र दक्षिण रायगड मधील तालुक्यांमध्ये रंगीत भाताचे (Rangit Bhat Lagwad) उत्पादन चांगल्या प्रमाणात आले. त्याचप्रमाणे काळ्या भातापेक्षा लाल भाताचे उत्पादन चांगले दिसून आले.

मागील हंगामात भात 91 हेक्टर क्षेत्रावर व काळा भात 93 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आणि त्यापासून अनुक्रमे 31 व 28 क्विंटल/ हेक्टर उत्पादन झाले. यावर्षी शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध असल्याने ते वेळेत लागवड करू शकतील, असे चित्र आहे. त्याचप्रमाणे त्यांना आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले असल्याने खरीप 22 मध्ये शासनाच्या मदतीशिवाय साधारण 500 हेक्टर क्षेत्रावर रंगीत भाताची (Rangit Bhat Lagwad) लागवड होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे व खते याचे मागणीप्रमाणे पुरवठा होईल, यासाठी वारंवार निविष्ठा पुरवठादारांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे क्षेत्रिय पातळीवर तालुका कृषी कार्यालयांनीही आपल्या तालुक्यासाठी आवश्यक आराखडा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

प्रत्येक गावाच्या पिकांचा व विस्तार कार्यक्रमांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे खते उपलब्धतेबाबत काही अडचणी असल्यास तात्काळ आपल्या जवळील कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांना कळवावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

खालील लेख देखील वाचा!

  1. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून व्हा आर्थिक संपन्न
  2. काजू प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन अनुदान !
  3. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  4. मार्जिन मनी योजना : उद्योगांसाठी १० टक्के तुम्ही उभारा; ७५ टक्के व १५ टक्के सबसिडी ! – Margin Money Scheme
  5. शेतमाल तारण कर्ज योजना – Shetmal Taran Karj Yojana (MSAMB)
  6. शून्य क्रेडिट आणि १००% रिकव्हरी राखण्यासाठी व्यवसाय धोरण !
  7. बटण मशरूम व्यवसाय संकल्पना!
  8. पीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  9. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांनी उद्योग कर्जासाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  10. कृषी सेवा केंद्र परवाना (बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना) ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  11. कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना
  12. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.