आत्मा योजने अंतर्गत शेतकरी गटाची नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर – Atma Shetkari Gat
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे प्राधान्य हे प्रथम शेतकरी गटाला दिले जाते. यामध्ये विविध शेतकरी हे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय व रेशीम उद्योग करणारे शेतकरी गट आहेत. या गटांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या स्पर्धा भरवणे, अनुदान देणे इत्यादी, बाबींचा लाभ दिला जातो. एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रात सामूहिक शेती करणे, शेती उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, एकत्रित विपणनासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे, या सर्व माध्यमांतून गट समूहाचा विकास घडवून आणणे म्हणजे गट अथवा समूह शेती. असा आत्मा योजने अंतर्गत शेतकरी गटाची नोंदणी प्रक्रिया आणि शेतकरी गट नोंदणी अर्जं नमुना कसा आहे? हे आपण या लेखात पाहणार आहोत.
आत्मा म्हणजे काय?
सन १९९८ ते २००५ या कालावधीत जागतिक बँकेच्या सहाय्याने देशातील ७ राज्यातील २८ जिल्हामध्ये राष्ट्रीय कृषि तंत्रज्ञान व्यस्थापन प्रकल्पाअंतर्गत (NATP) तंत्रज्ञान विस्तारामध्ये नाविन्यपूर्णता (ITD) या सदराखाली विस्तार विषयक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. ही योजना अतिशय यशस्वी ठरली व राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणाकरिता सहाय्य ही योजना अस्तित्वात आली. ही योजना सुरूवातीस २५२ जिल्हामध्ये विस्तारीत करण्यात आली. सन २००७ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास परिषदेमध्ये कृषि विस्तारामधील क्रांतिकारक बदलाची गरज प्रामुख्याने समोर आली. राष्ट्रीय शेतकरी आयोगाने (नॅशनल पॉलिसी फॉर फार्मर्स) कृषि विस्तार यंत्रणेत अमुलाग्र बदल सुचविला व सन २००५ ते २००९ या दरम्यान कृषि विस्तार कार्यक्रम सुधारणा अंतर्गत मिळालेल्या अनुभवातून व राज्य सरकारशी सल्ला-मसलत करून केंद्र शासनाने सध्याची राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्य ही योजना काही वैशिष्ट्यपूर्ण बदलासह प्रस्तावित केली.
आत्मा योजनेचा प्रमुख उद्देश व हेतु :
- राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकस्तरावर पुनर्रजिवीत, नव्याने स्वायत्ता संस्था स्थापन करणे.
- बहूद्देशीय संस्थांना कृषि विस्तारासाठी चालना देणे व पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत विस्तार सेवा पुरवठादारांचा समावेश करणे.
- शेती पद्धतींचा अवलंब, एकात्मिक व सर्वसमावेशक कृषि विस्तार कार्यक्रम राबविणे. विस्तार कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी व
- संनियंत्रण करीत असताना संलग्न विभागातील इतर कार्यक्रमासोबत सांगड घालणे.
- शेतकर्यांच्या गरजा व मागण्या विचारात घेऊन त्यानुसार शेतकरी समूह व शेतकरी गट स्थापन करणे.
- वरील उद्देश साध्य करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था व त्यासाठी आवश्यक समर्पित मनुष्यबळ यासाठी लागणारी आवश्यक आर्थिक तरतूद व निधीबाबतचे केंद्र व राज्य शासनाकडून नियोजन करणे.
आत्मा व्यवस्थापन समितीची कार्ये:
- जिल्हातील विविध सामाजिक आर्थिक समुह आणि शेतकरी यांना आसणार्या समस्या व अडचणी जाणून घेणे.
- जिल्ह्याचे एकात्मिक संशोधन कृषि विस्तार नियोजन करणे ज्यामध्ये लघु आणि मध्यम स्वरूपाचे तंत्रज्ञान प्रथम प्राधान्याने घेता येईल.
- जिल्हा शेतकरी सल्ला समितीच्या मदतीने वार्षिक कृती आराखडा तयार करणे जो आत्मा नियामक मंडळासमोर आढावा देणेसाठी व आवश्यक बदल करण्यासाठी तथा मंजुरीसाठी ठेवता येईल.
- लेखा परीक्षणासाठी आवश्यक ते प्रकल्प लेखा जतन करणे.
- सहभागी कृषि सलग्न विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बिगर सरकारी संघटना, खाजगी संस्था यांच्यात समन्वय ठेऊन वार्षिक कृती आराखडा राबविणे.
- तालुका व गांव पातळीवर शेतकरी माहिती व सल्ला केंद्र स्थापन करणे व त्याद्वारे एकात्मिक कृषि विस्तार व तंत्र ज्ञान प्रसार कार्यक्रम राबविणे.
- नियमित कार्यवाही अहवाल प्रत्यक्ष लक्ष साध्यासह आत्मा नियामक मंडळास पाठविणे जो नंतर कृषि व सहकार मंत्रालयास पाठविला जाईल.
- आत्मा नियामक मंडळाने स्विकारलेली धोरण, गुंतवणुकी संबंधाचे निर्णय व केलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम अंमलबजावणी करणे.
- आत्मा व्यवस्थापन समितीची जिल्ह्यातील विविध तालुक्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक आढावा बैठक होणे व सदरील बैठकीचा अहवाल राज्य मुख्यालय कक्षास पाठविणे.
जिल्हा नियामक मंडळाचे कार्य:
- जिल्हा कृषि संशोधन व विस्तार नियोजन याचा आढावा घेणे व विविध सहभागी घटकांनी सादर केलेल्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी देणे.
- जिल्हयाअंतर्गत विविध सहभागी घटकांनी राबविलेल्या कृषि संशोधन व विस्तार कार्याचा अहवाल व आढावा घेणे व गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन करणे..
- जिल्हयाअंतर्गत कृषि संशोधन व विस्तार आणि इतर कार्यक्रमांतर्गत निधि स्विकारणे व प्रकल्पानुसार वाटप करणे.
- शेतकरी समूह विकास व शेतकरी गट बांधणीसाठी देणे. शेतकर्यांना निविष्ठा, तांत्रिक सहाय्य, कृषि प्रक्रिया आणि पणन सेवा देण्यासाठी खाजगी क्षेत्रांना व इतर संघटनांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- सिमांत शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती शेतकरी, महिला शेतकरी यांना कृषि पत पुरवठा दार संस्थांनी जास्तीत जास्त मदत देणे संबंधी प्रोत्साहन देणे.
- कृषि सलग्न विभाग, कृषि विज्ञान केंद्र आणि प्रादेशिक संशोधन केंद्र यांनी शेतकरी सल्ला समिति स्थापन करून त्यांचे मूल्यमापन करणे संदर्भात मार्गदर्शन करणे व त्याबाबतचे नियोजन संबधित संशोधन विस्तार कार्यक्रमांतर्गत करणे.
- जिल्हातील कृषि विकासास उत्तेजन देणे व सहाय्य करणे व आवश्यक तेथे योग्य करार करणे. आत्मा आणि सहभागी घटकांच्या शाश्वत आर्थिक घडीसाठी उपलब्ध स्त्रोतरांची ओळख करून घेणे.
- उपलब्ध मनुष्यबळ व आर्थिक तरतुदीचा योग्य ताळमेळ घालून केंद्र शासनाच्या कृषि व सहकार विभागांतर्गत विविध कार्यक्रम व योजना उपयोगात आणणे.
- आत्मा लेखासंबंधी लेखा परीक्षण करणे. आत्म्याचे नियम आणि उपनियम स्विकारणे व दुरुस्त करणे.
प्रत्येक तीन महिन्यांनी आत्मा नियामक मंडळ बैठकीचे आयोजन करणे. जिल्हया मध्ये आत्मा प्रभावशाली अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कार्यावाही करणे. - आपल्या एक शेतकरी गट नोंदणी अर्ज भरून तो तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे. वेगवेगळ्या पिक निहाय किंवा कृषी उत्पादन निहाय शेतकरी यांचे गट तयार करणे यामध्ये अपेक्षीत आहे. गटाच्या सदस्यांची बैठक महिन्यातून किमान एक वेळा होणे अपेक्षीत आहे. तालुक्यातील त्या त्या पिकांचे गट एकत्र येउन गटांचा तालुका स्तरावर संघ करता येइल. तसेच सर्व तालुक्यातील त्या विशिष्ट पिकाचे गट मिळून शेतकरी उत्पादक कंपनी तयार करता येइल. गटांनी सर्व अभिलेखे, वेगवेगळ्या नोंद वह्या व रजिस्टर तसेच रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. उदा. बैठकांचे इतिवृत्त, बँक पासबूक रकमांचा हिशेब इ .
आवश्यक कागदपत्रे :-
- गटाच्या प्रथम सभेचे इतिवृत्त
- सदस्यांचे वैयक्तिक अर्ज
- सदस्यांचा ७/१२ व ८ अ
- ओळख पत्र – आधार कार्ड / मतदान कार्ड
- गटाचा करारनामा
- गट नोंदणी फी रु. १००
शेतकरी गट नोंदणी अर्ज नमुना:
शेतकरी गट नोंदणी अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
शेतकरी गटाची नोंदणी ऑनलाईन पहा:
आपल्या जिल्ह्यांनुसार आत्मा योजने अंतर्गत शेतकरी गटाची नोंदणी ऑनलाईन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी:
अधिक माहितीसाठी आपल्या किंवा शेजारील गावामधील गटाशी संपर्क करा, तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क करा.
आत्मा योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता बाबत शासन निर्णय:
राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानाच्या (NMAET) कृषि विस्तार उप अभियानातंर्गत, राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांमध्ये सुधारणांकरिता सहाय्य (आत्मा) योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!