कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ९ ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा ९ वा हप्ता जमा होणार (PM Kisan Yojana)

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेअंतर्गत दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील हप्त्याचे वितरण करणार आहेत.

या योजनेद्वारे 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वितरण होणार असून त्याचा लाभ 9 कोटी 75 लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधितही करणार आहेत.

PM-KISAN योजनेबद्दल

>

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2000/- रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण 6000/-रूपये इतका निधी दिला जातो.

हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 1.38 लाख कोटी इतका सन्मान निधी हस्तांतरित करण्यात आली आहे.

केंद्रीय कृषीमंत्रीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर आपल्यासाठी सरकारने आता ही सुविधा ऑनलाईन देखील प्रदान केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021 ची नवीन यादी अधिकृत संकेतस्थळ PMKisan वर तपासली जाऊ शकते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021 च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तापसण्यासाठी इथे क्लिक करा.

तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार:

सर्वात आधी आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील, तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.

तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या PM KISAN Help Desk ई मेल (Email) pmkisan [email protected] वर संपर्क करू शकता. इथेही काहीच प्रतिसाद न मिळाल्यास आपण 011 23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क करू शकता. तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी (Grievance PM Kisan) इथे क्लिक करा.

हेही वाचा – तुमचा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २००० चा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते चेक करा किंवा स्टेटस चेक करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.