महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामे

सबकी योजना सबका विकास जन मोहिमेअंतर्गत २ ऑक्टोबर २०२१ च्या ग्रामसभेमध्ये महसूल विभागाशी संबंधित विषय ठेवण्याबाबत शासन परिपत्रक जारी

ग्रामसभा हा पंचायतराजचा गाभा आहे. पंचायतराज व्यवस्थेतील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा् परिषद यांचा कारभार लोकप्रतिनिधींव्दारे चालतो, म्हणजेच निवडणुकीद्वारे मतदान करुन आपण आपले प्रतिनिधींव्दारे चालतो. आपण आपले प्रतिनिधी निवडतो. आपण देशाचा, राज्याचा कारभार चालवण्यासाठीही खासदार, आमदारांना अशाच प्रकारे निवडणुकीव्दा्रे निवडुन देतो. आपले प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. ही प्रतिनिधिक लोकशाही झाली. आपला देश विस्तृत पसरलेला आहे. लोकसंख्याही प्रचंड आहे. त्या‍मुळे त्या ठिकाणी प्रतिनिधीक लोकशाही आवश्यक आहे. पण थेट लोकशाही गावपातळीवर येऊ शकते. लोकशाहीचे, सत्तेचे विकेंद्रीकरण गाव स्तरावर शक्य आहे. ग्रामसभा ही ख-या अर्थाने लोकशाही संस्था आहे. कारण गावातील प्रत्येक प्रौढ मतदार व्यक्ती त्या गावच्या ग्रामसभेची सदस्य असते. तिला ग्रामसभेला उपस्थित राहण्याचा, आपले मत मांडण्या‍चा अधिकार आहे.

ग्रामपंचायत ही भारतीय खेड्यांमधील एक मूलभूत ग्रामीण शासित संस्था आहे. ही भारतातील तळागाळातील पातळीवर लोकशाही रचना आहे. हे एक राजकीय संस्था असून, खेड्याचे मंत्रिमंडळ म्हणून काम करतात. ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सामान्य मंडळाचे काम करतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम ७ व ८ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे.

सबकी योजना सबका विकास जन मोहिमेअंतर्गत २ ऑक्टोबर २०२१ च्या ग्रामसभेमध्ये महसूल विभागाशी संबंधित विषय ठेवण्याबाबत शासन परिपत्रक :

देशातील ग्रामपंचायतींचा विकास करण्यासाठी “सबकी योजना सबका विकास” या नावाने दिनांक २ ऑक्टोबर २०२० ते दिनांक ३१ जानेवारी २०२१ दरम्यान सुरू करण्यात आलेली जन मोहिम दिनांक २ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आली असून सदर जन मोहिमेचा शुभारंभ दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार असल्याचे कळविले आहे.

>

सदर मोहिमेदरम्यान दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये महसूल विभागाशी संबंधित खालील विषय ठेवण्याबाबत ग्रामविकास विभागास शासनस्तरावरून कळविण्यात आले आहे.

१) ग्रामसभेमध्ये खाते उताऱ्यांचे वाचन करणे.

२) वर्षभरामध्ये मंजूर विनातक्रार फेरफार नोंदीची माहिती ग्रामसभेला देणे .

३) दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार कळविल्यानुसार दिनांक २ ऑक्टोबर २०२१ पासून एका खातेदारास एकदा संगणकीकृत डीजीटल स्वाक्षरीत ७/१२ उपलब्ध करून देणे बाबत घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देणे.

४) १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या ई पीक पाहणी प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबतची माहिती शेतकरी खातेदार यांना देणे व गावातील ई पीक पाहणी न केलेल्या खातेदार यादीचे वाचन करणे.

५) महसूल विभागाच्या सामान्य जनतेसाठी असलेल्या इतर ऑनलाईन सुविधांची माहिती ग्रामसभेला देणे.

दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये महसूल विभागाशी संबंधित उपरोक्त मुद्यांचे अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत महसूल विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

शासन परिपत्रक : “सबकी योजना सबका विकास” जन मोहिम दिनांक २ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक ३१ जानेवारी २०२२ अंमलबजावणीबाबत सुचना परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – ग्रामपंचायत ग्रामसभा नियम व अटी (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.