महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेष

२६ जानेवारी, २०२३ प्रजासत्ताक दिनी जल जीवन मिशनच्या विशेष ग्रामसभा – 26th January, 2023 Gram Sabha

देशभरात केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाचे माध्यमातून सन २०१९ पासून जल जीवन मिशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. सदर अभियानांतर्गत “ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह पुरेसे (५५ लिटर प्रति मानसी, प्रतिदिनी) व नियमित स्वरुपात पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. अद्यापपर्यंत महाराष्ट्र राज्यात सर्व ३४ जिल्हयातील एकुण १,०६,१०,७२० (७२.३१%) कुटुंबांना कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच, माहे मार्च २०२४ अखेर पर्यंत संपूर्ण राज्य हे “हर घर नल से जल” म्हणून घोषित करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे.

२६ जानेवारी, २०२३ प्रजासत्ताक दिनी जल जीवन मिशनच्या विशेष ग्रामसभा – 26th January, 2023 Gram Sabha:

सदरच्या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दी देणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

अ) ग्रामसमे दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करून विशेष स्थान देण्यात यावे व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थितांना अवगत करावे.

आ) पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षीत करण्यात आलेल्या महिलांना सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात यावे व सदर महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिध्द करावीत, जेणेकरून त्यांचा उत्साह वाढीस लागून पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल.

इ) ज्या ग्रामपंचायतींमध्ये क्षेत्रिय तपासणी संच (FTK) पोचलेले नसतील त्या ठिकाणी जिल्हा व पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून सत्वर कार्यवाही करण्यात यावी.

ई) ग्रामसभे दरम्यान क्षेत्रिय तपासणी संच (FIR) च्या माध्यमातून महिलांद्वारे खोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती ग्रामसभेमध्ये समजावणेबाबत उचित कार्यवाही करावी.

उ) ज्या ग्रामपंचायतीत क्षेत्रिय तपासणी संच उपलब्ध असतील त्या ठिकाणी पाणी गुणवत्ता तपासणी अनुषंगाने महिलांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करण्यात यावे जेणेकरून ग्रामस्थांचा नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाणी गुणवत्तेच्या अनुषंगाने आत्मविश्वास वाढीस लागेल.

क) ग्रामसभे दरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजुर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती इ. तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात यावी व त्याअनुषंगाने चर्चा घडवून आणावी.

ऋ योजनेअंतर्गत गावातील पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा (लोकवर्गणी ५% किंवा १०%), जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्याबाबत चर्चा घडवून आणण्यात यावी.

ला ज्या ठिकाणी योजनेची भौतिक कामे अंतिम टप्प्यात आहेत अशी गावे “हर घर नल से जल” म्हणून घोषित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत.

ऍ) नळ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वानंतर योजना शाश्वततेच्या दृष्टीने आवश्यक पाणीपट्टी वसुली तसेच योजनेची थकीत पाणीपट्टी वसुलीसंदर्भात विशेष चर्चा करण्यात यावी.

ऐ) दिनांक २६ जानेवारी पूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची माहिती दर्शविणारे समूह माहिती फलक (Community Information Board) योजनेच्या ठिकाणी यापूर्वी प्रदर्शित केला नसल्यास, तो प्रदर्शित करणे व ग्रामसभेमध्ये अवगत करणे.

आपल्या जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये वरील सर्व नमुद बाबींच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करुन त्याअनुषंगाने कार्यवाहीबाबतचा निवडक वावनिहाय छायाचित्रांसह संक्षिप्त अहवाल तसेच नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले असल्यास त्यासंदर्भातील अहवाल या कार्यालयास दिनांक ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी पर्यंत सादर करण्यात यावा हि विनंती. मा. अभियान संचालक, जल जीवन मिशन यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

हेही वाचा – ग्रामपंचायत ग्रामसभा नियम व अटी (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “२६ जानेवारी, २०२३ प्रजासत्ताक दिनी जल जीवन मिशनच्या विशेष ग्रामसभा – 26th January, 2023 Gram Sabha

  • प्रशांत बाळासाहेब धुमाळ

    अतिशय छान व उपयुक्त माहिती इथ मिळते त्याबद्दल धन्यवाद

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.