आपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामे

आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी, मागणी अर्ज, रिक्त केंद्रांची यादी (2022-23) – Aaple Sarkar Seva Kendra Active Center List, Application Form and Vacant List (2022-23) Raigad District

आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी आणि रिक्त केंद्रांची यादी रायगड अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध करून आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज मागिवले आहेत. आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दिनांक १२/१०/२०२२ रोजी साय. ०६.१५ वा. पर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथे प्राप्त होणे आवश्यक आहे.

आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी, मागणी अर्ज, रिक्त केंद्रांची यादी (2022-23) – Aaple Sarkar Seva Kendra Active Center List, Application Form and Vacant List (2022-23) Raigad District:

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सी. एस. सी. प्रमाणपत्र
  • चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ( Police Clearanace Certificate )
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • संगणकीय प्रमाणपत्र
  • जागेचे कागदपत्र ( जागा स्वतःच्या मालकीची असल्यास असेसमेंट दाखला किंवा लगतच्या वर्षाची घरपट्टी ( Property Tax ) भरल्याची पावती. तसेच जागा भाड्याची असल्यास नोंदणीकृत भाडे करारपत्र,
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र,

अटी व शर्ती:

१. अर्ज मंजूर करणे किंवा नामंजूर करणे याचा अधिकार अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती कडे असतील,

२. अर्जदार दिव्यांग असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ( प्रमाणपत्र असणे अनिवार्य )

३. आपले सरकार सेवा केंद्र कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्याचे आहे त्या ठिकाणी जागा रिक्त आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी रिक्त केंद्राची यादी डाउनलोड करून पाहण्यात यावी. रिक्त असलेल्या ठिकाणीच आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करण्यास परवानगी देण्यात येईल.

४. अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

५. अर्जामधील संपुर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे. तसेच मागणी अर्ज मध्ये नमूद असलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत सोबत जोडणे अनिवार्य आहे.

६. सर्व कागदपत्रावर स्वतःची स्वाक्षांकित ( Self – Attested ) असणे आवश्यक आहे नसल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल.

७. आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करण्याचे असल्यास प्रथम आपल्याकडे CSC ( Common Service Center ) असणे आवश्यक आहे.

८. CSC ( Common Service Center ) केंद्र नसल्यास नवीन अर्ज करण्याचे असल्यास https://register.csc.gov.in संकेतस्थळावरती ऑनलाइन अर्ज करण्यात यावा. सदरचे संकेतस्थळ बाबत किंवा अर्जदार यांनी केलेल्या अर्जाबाबत काही शंका / तक्रार असल्यास जिल्हा समन्वयक, CSC ( Common Service Center ) यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

९. अर्जदार यांच्या कडे CSC केंद्र नसल्यास अर्जदार CSC केंद्र घेण्यास भौगोलिक दृष्ट्या पात्र ठरत असल्यास म्हणजे मुद्दा क्र. ९ नुसार नवीन CSC केंद्रासाठी अर्ज केलेले आहे त्या अर्जाची ऑनलाइन येणारी अर्ज पावती सदर आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

१०. अर्जदार आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र ठरल्यास अर्जामध्ये नमूद असलेल्या जागेवरच केंद्र सुरु करणे अनिवार्य आहे.

११ . सदरचा अर्ज दिनांक १२/१०/२०२२ रोजी साय. ०६.१५ वा. पर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथे प्राप्त होणे आवश्यक आहे.

आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज: आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आपल सरकार सेवा केंद्र रिक्त यादी: आपल सरकार सेवा केंद्र रिक्त यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी: आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत केंद्रांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.