Aaple Sarkar Grievances Maharashtra : आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली मधील तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही !
राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारीचे ऑनलाईन पध्दतीने एकाच ठिकाणी निवारण करुन घेता यावे, यासाठी “आपले सरकार” ही तक्रार निवारण प्रणाली (Aaple Sarkar Grievances Maharashtra) मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व ३६ जिल्हयांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. याबाबतची कार्यपध्दती संदर्भाधिन शासन निर्णयान्वये विशद करण्यात आलेली आहे.
तथापि अद्यापही काही तक्रारी या आपले सरकार तक्रार प्रणालीवर नागरिकांकडून करण्यात येत नाहीत. सबब आता शासनाकडे तसेच शासनाच्या अधिनस्त कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी या “आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमार्फतच स्विकारण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली मधील तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही ! Aaple Sarkar Grievances Maharashtra:
मंत्रालयीन विभागाकडे तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यालयाकडे नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी संदर्भात खालील कार्यवाही करण्यात यावी:
1. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी या आपले सरकार तक्रार प्रणालीमार्फत ऑनलाईन (Online) स्वरुपातच स्विकारण्यात याव्यात.
2. तथापि, मंत्रालयीन विभागाकडे / शासकीय प्राधिकारणाकडे / अधिनस्त कार्यालयांकडे यापूर्वी तसेच यानंतर ऑफलाईन स्वरुपात प्राप्त झालेल्या / होणा-या तक्रारींचा समावेश आपले सरकार तक्रार प्रणालीमध्ये ऑनलाईन (Online) स्वरुपात सदर तक्रारीची पोच देणा-या कार्यालयाने करावा आणि सदर तक्रार निवारणासाठी संबंधितांकडे ऑनलाईन (Online) स्वरुपात पाठवावी, जेणेकरुन नागरिकांना / तक्रारदाराना सदर तक्रारीचा ऑनलाईन पाठपुरावा करता येईल.
3. कोणत्याही कार्यालयात पोस्टाने अथवा पत्र स्वरूपात प्राप्त होणा-या तक्रारी संबंधित कार्यालयाने “आपले सरकार तक्रार प्रणालीमध्ये ऑनलाईन (Online) समाविष्ट कराव्यात व त्या पुढील कार्यवाहीस्तव ऑनलाईन (Online) स्वरुपात संबंधिताकडे पाठवाव्यात, जेणेकरुन नागरिकांना / तक्रारदाराना सदर तक्रारीचा ऑनलाईन पाठपुरावा करता येईल. समक्ष लेखी तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराचा मोबाईल नंबर तक्रार अर्जावर नमूद करण्याची विनंती करण्यात यावी जेणेकरून तक्रार प्राप्त झाल्याबाबतचा लघु संदेश त्याला पाठविता येईल.
4. ज्या मंत्रालयीन विभागाने/प्राधिकारणाने/अधिनस्त कार्यालयाने स्वतःची तक्रार निवारण कार्यप्रणाली विकसित केली असेल त्यांनी सदर कार्यप्रणालीशी आपले सरकार तक्रार निवारण कार्यप्रणालीशी सांगड (Link) घालावी.
5. मंत्रालयीन विभागाने/प्राधिकारणाने/अधिनस्त कार्यालयाने त्यांच्याकडे आपले सरकार तक्रार प्रणालीवर दिनांक १ डिसेंबर, २०२२ रोजी प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा पुढील दोन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावा.
या सूचनाचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयांनी घ्यावी.
- शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर – (आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली) Grievances Maharashtra
- आपले सरकार २.० – तक्रार निवारण प्रणालीची कार्यपध्दती अद्ययावत ! Aaple Sarkar 2.0 Grievances Maharashtra
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय : आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमधील तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!