आंबिया बहार फळपीक विमा योजना 2020-21 अनुदान निधी मंजूर
शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१ राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.
या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना सन २०२०-२१ संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्ट्राबेरी (आंबिया बहार) या ८ फळपिकांसाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स.कं.लि., बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स.कं.लि. व भारतीय कृषि विमा कंपनी लि. या विमा कंपन्यांमार्फत खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. १ व २ मधील शासन निर्णयान्वये राबविण्यात आली आहे.
पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत सन २०२०-२१ आंबिया बहारासाठी भारतीय कृषि विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची व प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरीत करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. ५ अन्वये सादर केली आहे. त्यास अनुसरून निधी वितरीत करण्याची बाब विचाराधीन होती.
पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२०-२१ अंतर्गत कृषि आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी रू. १४९.५ कोटी इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास तसेच योजनेच्या प्रशासकीय व इतर कार्यालयीन खर्चासाठी रु. ५०.०० लाख अशाप्रकारे एकूण रक्कम रू.१५० कोटी निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
प्रस्तुत प्रयोजनार्थ सहायक संचालक (लेखा), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
सदर निधी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचना आणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/ परिपत्रक नुसार खर्च करण्यात येणार.
शासन निर्णय : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2020-21 मध्ये राज्य हिस्सा याची रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी व योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग नुकसान भरपाईसाठी असा करा क्लेम आणि लाभ मिळवा – Crop Insurance Claim
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!