आपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

सरकारी योजना किंवा सरकारी कामे असो; मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स! Best 3 Mobile Apps for Government Schemes and Works

सरकारी योजनांची माहिती असो, सरकारी कामे किंवा कुठे सरकारी कागदपत्रांद्वारे व्हेरिफिकेशनची आवश्यकता असो, काही मोबाइल ॲप्स अशा कामांसाठी खूपच फायदेशीर ठरतात. हे ॲप्स सरकारी सेवांबद्दलही अपडेट देतात. जाणून घेऊया अशाच ३ ॲप्सबाबत.

रकारी योजना किंवा सरकारी कामे असो; मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स! – Best 3 Mobile Apps for Government Schemes and Works:

१) डिजिलॉकर ॲप (DigiLocker):

डिजिलॉकर हा डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. लोकांची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी हे ॲप तयार केले आहे. येथे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुरक्षित ठेवता येतात. या ॲपसह वापरकर्त्याला कागदपत्रांची हार्ड कॉपी बाळगण्याची गरज नाही. अशा प्रकारे हे ॲप काम सोपे करते.

मागील लेखामध्ये आपण डिजिलॉकर ॲप मधून प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना ५ लाख विमा PMJAY हेल्थ कार्ड मोफत डाऊनलोड कसे करायचे? ते सविस्तर पाहिलं आहे, तसेच डिजिलॉकर ॲप मधून गाडीचे आरसी बुक (Duplicate RC book) डाउनलोड असे करायचे? ते देखील सविस्तर पाहिलं आहे, असे इतरही अनेक कामे आपण या ॲप मधून करण्यासाठी डिजिलॉकर ॲप डाउनलोड करा.

२) एम-आधार ॲप (mAadhaar):

बँकांसह अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अनेक प्रकरणांमध्ये एम- आधारदेखील वैध आहे. या ॲपच्या मदतीने युजर्स आधार कार्डची डिजिटल कॉपी मिळवू शकतात आणि ती सेव्ह करु शकतात. याच्या मदतीने आधार अपडेटही करता येईल. हे ॲपअनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

मागील लेखामध्ये आपण आधार कार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड कसे करायचे?, आधार कार्ड अपडेट कसे करायचे? आधार PVC कार्ड कसे मागवायचे? ते सविस्तर पाहिलं आहे , असे इतरही अनेक कामे आपण या ॲप मधून करण्यासाठी एम-आधार ॲप डाउनलोड करा.

३) उमंग ॲप (UMANG):

उमंग ॲपच्या मदतीने, पीएफ बॅलेन्स तपासण्यापासून पॅन कार्डसाठी अर्ज करण्यापर्यंतची कामे करता येतात. याशिवाय गॅस बुकिंग, वीज आणि पाण्याची बिले जमा करणे यासह १२०० हून अधिक सरकारी सुविधांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. हे ॲप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये लॉन्च केले होते.

मागील लेखामध्ये आपण उमंग ॲपवरून ई-श्रम यूएएन कार्ड डाउनलोड कसे करायचे?, घरकुल यादी डाउनलोड कशी करायची? ते सविस्तर पाहिलं आहे, असे इतरही अनेक कामे आपण या ॲप मधून करण्यासाठी उमंग ॲप डाउनलोड करा.

हेही वाचा – घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ – Government Services Online

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.